Opportunity to become CNG, PNG distributor Modi government will give the license
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 03:46 PM2020-09-12T15:46:26+5:302020-09-12T15:55:15+5:30Join usJoin usNext सीएनजी आणि पीएनजीची रिटेल डिस्ट्रिब्यूटरशिप घेण्याची आपली इच्छा असेल, तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे. पुढील काही दिवसांत यासाठी लायसन्स वितरित करण्यात येणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध शहरांत सीएनजी आणि पीएनजी वितरण लायसन्स देण्यासंदर्भात लवकरच लिलाव सुरू होणार आहेत. प्रधान यांनी सांगितले, शहरांमध्ये गॅस वितरण करण्यासाठी लिलावाची 11वी फेरी लवकरच सुरू होईल. पीएनजीआरबी यासंदर्भात तयारीही करत आहे. या 11व्या फेरीतील लिलाव प्रक्रियेनंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भातील 50 ते 100 जिल्ह्यांपर्यंत शहरी गॅस नेटवर्कची सुविधा पोहोचेल, असेही प्रधान यांनी सांगितले. पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) 2018 आणि 2019 दरम्यान देशातील 136 भागांत वाहनांसाठी सीएनजी आणि घरांसाठी पाइप्ड नॅचरल गॅसचा (पीएनजी) स्वतःचा उद्योग करण्यासाठी लायसन्स दिले आहे. यामुळे देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या आणि 406 जिल्ह्यांपर्यंत गॅस वितरित करण्यास मदत मिळाली आहे. आता सरकारच्या या नव्या धोरणामुळे जवळपास 500 शहरांपर्यंत पर्यावरण पुरक ईंधन पोहोचणार आहे. देशभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण उर्जेपैकी, नैसर्गिक गॅसचा वाटा केवळ 6.3 टक्के एवढाच आहे. देशभरात वापरल्या जाणाऱ्या उर्जेत 2030पर्यंत नैसर्गिक गॅसचा वाटा 15 टक्के करण्याचे लक्ष्य आहे.टॅग्स :नरेंद्र मोदीविदर्भछत्तीसगडमध्य प्रदेशभाजपाकेंद्र सरकारNarendra ModiVidarbhaChhattisgarhMadhya PradeshBJPCentral Government