Vinesh Phogat Net Worth : 4 आलिशान कार, कोट्यवधींचं घर, शेअरमध्येही 19 लाख...; विनेश फोगाटची संपत्ती जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:07 PM2024-09-11T23:07:40+5:302024-09-11T23:28:05+5:30

Vinesh Phogat Net Worth: विनेशने बुधवारी (11 सप्टेंबर) काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे...

माजी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आता काँग्रेस पक्षाकडून हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. काँग्रेसने 30 वर्षीय विनेशला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

विनेशने बुधवारी (11 सप्टेंबर) काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे.

विनेशने सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, तिचे 2023-24 या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 13 लाख 85 हजार 152 रुपये आहे. तर तिचा पती सोमवीर राठीचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 44 हजार 220 रुपये एवढे आहे.

विनेश कुटुंबाकडे रोख 2 लाख 10 हजार रुपये आहेत. याशिवाय विनेशचे ॲक्सिस, एसबीआय आणि आयसीआयसीआय यां बँकांमध्ये खातेही आहे, यांत सुमारे 40 लाख रुपये आहेत. तर तिच्या पतीचे दोन बँक खाते असून एका बँकेत 48,000 रुपयांची एफडी आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक - विनेशची शेअर बाजारात कसल्याही प्रकारची वैयक्तिक गुंतवणूक नाही. मात्र तिच्या पतीने शेअरबाजारातील बऱ्याच कंपन्यांमद्ये पैसा लावला आहे. विनेशच्या पतीची (सोमवीर राठी)एकूण 6 कंपन्यांमध्ये 19 लाख 7 हजार रुपयांहून अधिकची गुंतवणूक आहे.

याशिवाय, विनेशने 1.50 लाख रुपयांचा विमाही करून ठेवला आहे. तर तिच्या पतीकडे 14 लाख 59 हजार रुपये प्रीमियमची पॉलिसी आहे.

लाखो रुपयांच्या आलिशान कार - कारसंदर्भात बोलायचे झाल्यास, तिच्याकडे 3 आलिशान कार आहेत, तर तिच्या पतीकडे एक आलिशान कार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार या वाहनांची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये एवढी आहे.

विनेशच्या कार कलेक्शनसंदर्भात बोलायचे झाल्यास, तिच्याकडे Volvo XC 60 (किंमत 35 लाख रुपये), Hyundai Creta (किंमत 12.02 लाख रुपये), Toyota Innova (किंमत 17.04 लाख रुपये) आणि TVS Jupiter बाइक (किंमत 40,220 रुपये). याशिवाय तिच्या पतीच्या नावावर एक Mahindra Scorpio-N (किंमत 19.57 लाख रुपये) आहे.

विनेशची स्थावर-जंगम मालमत्ता - काँग्रेस उमेदवार विनेशकडे 1.10 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 1.85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर तिच्या पतीकडे एकूण 57.35 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

31 डिसेंबर 2019 रोजी, विनेश फोगाटने 1 कोटी 85 लाख रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती, तिचे बाजार मूल्य आता 2 कोटी रुपये एवढे झाले आहे.

किती रुपयांचे कर्ज? विनेश फोगाटच्या नावावर 13.61 लाख रुपयांचे कार लोन आहे. तर तिच्या पतीवर 19.32 लाख रुपयांचे कर्ज आहे. सोन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, विनेशकडे 35 ग्रॅम सोने आणि 50 ग्रॅम चांदी आहे. याशिवाय तिच्या पतीकडे 28 ग्रॅम सोने आणि 100 ग्रॅम चांदी आहे.