बाबो! 2 वर्षांत 6 लग्नं, नववधू प्रियकरासह पळून गेली सर्वांसमोर बाईकवर बसून, कुटुंबीय राहिले पाहत By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:17 PM 2022-02-03T19:17:16+5:30 2022-02-03T19:32:26+5:30
Crime News : मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एका लुटेरू नववधूची घटना समोर आली आहे. स्वत:ला अनाथ सांगणाऱ्या या तरुणीने न्यायालयाच्या आवारात असलेल्या मंदिरात लग्न केले, त्यानंतर वराला चकमा देत दागिने आणि रोख रक्कम घेऊन सर्वांसमोर प्रियकरासह दुचाकीवरून पळ काढला. काही वेळातच वकिलांनी लुटारू वधूसोबत आलेल्या कथित काकूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर आले. दोन वर्षांत अर्धा डझनहून अधिक विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
छिंदवाडा येथील रहिवासी असलेला दशरथ पटेल दोन दिवसांपूर्वी मोठी स्वप्ने पाहून लग्नासाठी जबलपूरला आला होता.
त्याने नववधू म्हणजेच रेणू राजपूत हिच्यासोबत मंदिरात सात फेरेही घेतले. यानंतर दोघेही कोर्टात लग्नाची नोंदणी करण्यासाठी जात होते, मात्र यादरम्यान दुचाकीवर बसलेली वधू दुचाकीवरून उतरली आणि दुसऱ्या दुचाकीस्वारासह फरार झाली.
वधू अचानक पळून गेल्यानंतर, वर आणि त्याचे नातेवाईक ताबडतोब न्यायालयाच्या आवारात परतले, जिथे तिची मावशी अर्चना बर्मन हिला वकिलांनी घेरले. माहिती मिळताच ओमटी पोलीस घटनास्थळी पोहोचले व महिलेला पकडून पोलीस ठाण्यात आणले.
वराचे काका आणि काकू जबलपूर येथे राहतात आणि किराणा दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात एक महिला वारंवार येत असे. दशरथची मावशी सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्या महिलेशी तिच्या भाच्याचे लग्न करण्याबाबत चर्चा केली, त्यानंतर महिलेने तिला रांझी येथील रहिवासी असलेल्या तिच्या भाचीबद्दल सांगितले.
वराच्या काकूने सांगितले की, महिलेने सांगितले की, रेणूला आई-वडील नाहीत, ती अनाथ आहे आणि तिच्या लग्नाची जबाबदारी तिच्यावर आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी लग्नासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. ओमटी पोलीस ठाण्याचे प्रभारी एसपीएस बघेल यांनी सांगितले की, आरोपी रेणू उर्फ संगीता अहिरवार आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
त्यांची चौकशी करण्यात येत असून या लोकांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या असाव्यात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कथित मावशी अर्चना पोलीस कोठडीत असल्याची माहिती मिळताच वधू रेणू हिने रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठले. मात्र तिच्याकडे दागिने व पैसे नव्हते.
पोलिसांनी रेणूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती धन्वंतरीनगर येथील रहिवासी संगीता अहिरवार असून, तिच्याकडे रेणूच्या नावाने बनावट आधारकार्डही असल्याचे समोर आले. सुरुवातीच्या चौकशीत 2 वर्षात सहा लग्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी रेणू उर्फ संगीता, अर्चना बर्मन, अमर सिंह आणि रेणूचा प्रियकर अजय यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अर्चना बर्मन या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.