पतीच्या छातीवर बसून दाबला त्याचा गळा, मग रात्रभर त्याच्यासोबत झोपली; करवा चौथच्या दिवशी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 02:27 PM2021-10-26T14:27:47+5:302021-10-26T14:38:31+5:30

Madhya Pradesh Crime News : साधारण २० दिवसांनंतर मृत व्यक्तीची ओळख पटली आणि त्याचं नाव पोषण सिंह रावत असल्याचं समोर आलं. त्याची पत्नी बसंती देवी रावतने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

मध्य प्रदेशच्या ग्लाव्हेरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने ज्या पतीसोबत सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली होती, ती तिच्यापेक्षा वयाने लहान तरूणाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर करवा चौथच्याआधी तिने पतीसाठी उपवास ठेवणार नाही असं आश्वासन प्रियकराला दिलं होतं. ज्यानंतर तिने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा प्लॅन केला आणि मग पतीची हत्या केली.

ग्वाल्हेर जिल्ह्याच्या चीनोर पोलिसांना सूचना मिळाली की, चीनोरजवळ कालव्यात एक मृतदेह तरंगत आहे. ज्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. तेव्हा खुलासा झाला की, या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर गळा दाबून झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही घटना ६ सप्टेंबरची होती.

साधारण २० दिवसांनंतर मृत व्यक्तीची ओळख पटली आणि त्याचं नाव पोषण सिंह रावत असल्याचं समोर आलं. त्याची पत्नी बसंती देवी रावतने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांना पत्नीवर संशय आला तेव्हा तिची चौकशी केली.

प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, पोषण सिंह रावत आणि बसंती देवीचं लग्न ११ वर्षाआधी झालं होतं. दोघांना दोन मुलंही आहेत. पोषण मजूरी करून परिवार चालवत होता. बसंतीच्या जबाबानुसार, तिच्या पतीला दारूची सवय होती आणि तो अनेकदा मारहाणही करत होता. अशात बसंती ११ वर्षाने लहान मनीष रावतच्या प्रेमात पडली. दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांनी पोषण सिंहच्या हत्येचा प्लॅन केला.

प्रियकर मनीष रावतने प्रेयसी बसंतीला पतीसाठी यावेळी करवा चौथचा उपवास ठेवू नको असं सांगितलं. पत्नीही म्हणाली की, यावेळी ती पतीसाठी व्रत ठेवणार नाही. अशात दोघांनी पोषणला रस्त्यातून बाजूला करण्याचा प्लॅन केला. ४ सप्टेंबरला प्रियकर मनीष बसंतीच्या घरी पोहोचला. बसंतीने दोन्ही मुलांना काही कामात व्यस्त केलं आणि दोघांनी मिळून पोषण सिंहची हत्या केली. पत्नी पतीच्या छातीवर बसली आणि प्रियकराने त्याचा गळा आवळला. नंतर पत्नीनेही पतीचा गळा दाबला. ज्यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर मनीष रावत घटनास्थळावरून फरार झाला. कारण तो एकटा पोषणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावू शकला नाही. अशात तो म्हणाला की, तो दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावेल. हैराण करणारी बाब म्हणजे पत्नीने आपल्या पतीच्या मृतदेहासोबत रात्र घालवली, तिने पतीच्या मृतदेहावर चादर टाकली आणि ती त्याच्यासोबतच झोपली. जेणेकरून मुलांना संशय येऊ नये.

पत्नीने ५ सप्टेंबरचा दिवसही तिने पतीसोबत असा घालवला जणू सर्वांना वाटावं की, पोषण सिंह जिवंत आहे. तो आराम करतो आहे. पाच तारखेला रात्री मनीष मित्र रविंद्रला सोबत घेऊन आला आणि पोषण सिंहचा मृतदेह बाइकवरून घेऊन गेला. त्यानंतर चार किलोमीटर अंतरावर जाऊन पोषण सिंहचा मृतेदह एका कालव्यात फेकला.

खास बाब म्हणजे यात अजिबात काही योगायोग होऊ शकत नाही की, पत्नी बसंतीने आपल्या पतीसाठी करवा चौथचं व्रत ठेवलं नाही. आणि ४ सप्टेंबरला तिने त्याची हत्या केली होती. पण घटनेच्या साधारण ५२ दिवसांनंतर करवा चौथच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी बसंती, तिचा प्रियकर मनीष आणि त्याचा मित्र रविंद्रला अटक केली.