धक्कादायक! प्राध्यापिका पत्नीने डॉक्टर पतीला आधी दिल्या झोपेच्या गोळ्या नंतर शॉक देऊन केली हत्या, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:48 PM 2021-05-10T15:48:55+5:30 2021-05-10T16:21:25+5:30
छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नीरज पाठक यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना पत्नीनेच दिली होती. ही जिल्ह्यातील हाय प्रोफाइल केस होती. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या छतरपूर (Chhatarpur) जिल्ह्यात पती दगा देत असल्याच्या संशयावरून प्राध्यापिक असलेल्या ६१ वर्षीय पत्नीने ६३ वर्षीय डॉक्टर पतीची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी महिलेला अटक केलीये. पोलिसांनी सांगितले की, पत्नीने आधी पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि नंतर त्याला विजेचे झटके देऊनन त्याची हत्या (Wife Murdered Husband) केली.
छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नीरज पाठक यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना पत्नीनेच दिली होती. ही जिल्ह्यातील हाय प्रोफाइल केस होती. त्यामुळे पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. एक एक धागा जोडत पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवली.
डॉक्टरच्या पत्नीने सांगितलं की, ती झांसीला गेली होती आणि जेव्हा परत आली तर पतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं तर त्यात डॉक्टर नीरज पाठक यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचं आढळून आलं. पोलिसांनी पत्नीवर आधीपासून संशय होता.
कारण पती-पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. ज्यानंतर पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली. तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.
छतरपूर जिल्ह्याचे डीएसपी शशांक जैन यांनी सांगितले की, पत्नी ममता पाठक यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, तिचा आणि पतीचा अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.
तिला संशय होता की, डॉक्टर नीरज पाठक हे तिच्या जेवणात असे काही पदार्थ मिक्स करत होते ज्याने तिला मानसिक विकाराची लक्षणे दिसत होती.
तेच आरोपी ममता पाठकने संधी मिळताच २९ एप्रिलला डॉक्टर नीरज पाठकच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि त्याला बेशुद्ध केलं. ज्यानंतर तिने त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केली.
डीएसपी शशांक जैन म्हणाले की, कुणालाही संशय येऊ नये म्हणून पतीचा मृतदेह घरीच सोडून आरोपी ममता पाठक झांसीला गेली आणि तेथून परत येऊन १ मे रोजी स्वत:च पतीच्या हत्येची एफआयआर दाखल केली.
पोलिसांना तपासादरम्यान आढळून आलं की, पत्नीने एकटीनेच हे हत्याकांड केलं. पोलिसांनाही दुसऱ्या कुणाचे काही पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी ममता पाठकला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.