Shocking! लग्नासाठी आलेल्या विवाहित महिलेवर नवरदेवाने केला रेप, नवरदेवाच्या बहिणीनेच केली यासाठी मदत By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:01 PM 2021-07-22T13:01:26+5:30 2021-07-22T13:16:45+5:30
Madhya Pradesh Rape News : ही घटना समोर येताच लोक हैराण झाले आहेत. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्यावर तिला जीवे मारण्याची धकमी दिली होती. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमधून एक बलात्काराची (Rape) खळबळजनक घटना समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, एक विवाहित महिला माम सासऱ्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आली होती. इथे नवरदेवानेच तिच्यासोबत बलात्कार केला.
पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक करून तरूंगात पाठवलं आहे आणि पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
पीडितेने आरोप केला की, नवरदेवाच्या बहिणीने तिला एका खोलीत बंद केलं होतं आणि ८ जुलैला तिच्यासोबत बलात्कार करण्यात आला.
ही घटना समोर येताच लोक हैराण झाले आहेत. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्यावर तिला जीवे मारण्याची धकमी दिली होती.
पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीच्या बहिणीलाही अटक करून तिला न्यायालयात हजर केलं. पीडितेने सांगितलं की, आरोपी अनिल हा तिच्या माम सासऱ्यांचा मुलगा आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, आरोपीने तिच्यासोबत तीन वेळा बलात्कार केला. तब्येत बिघडल्याने जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.
सांवेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल थानसिंह पटेल म्हणाले की, पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, जेव्हा ती लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती. तर तिला तिच्या नणंदेने एका रूममद्ये घेऊन गेली.
या रूममध्ये नशेत धुंद असलेला नवरदेव हातांवर मेहंदी लावून होता. या रूममध्ये आरोपी आणि त्याच्या बहिणीने तिला पकडलं आणि तिच्यासोबत अतिप्रसंग करण्यात आला.
इतकंच नाही तर दुसऱ्यांदा बलात्कार केला तेव्हाही आरोपीची बहीण पीडितेला शेजारच्या घरात घेऊन गेली होती. तिथेही आरोपी आधीच उपस्थित होता. इथेही त्याने तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने आरोप केला की, आरोपीने तिच्यावर एक-दोन नाही तर तीन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी या घटनेत सहभागी दोन्ही आरोपींना अटक केली आणि पुढील चौकशी करत आहेत.