कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:51 PM2024-06-05T14:51:42+5:302024-06-05T14:57:32+5:30

Loksabha Election 2024: कुणाची हॅट्रिक तर कोणी पहिल्याच संधीचं केलं सोनं! लोकसभा निवडणुकीत खरे उतरले 'हे' सेलिब्रिटी

Loksabha Election Result 2024 : ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यंदाच्या निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनाही राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालं होतं.

पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही लोकांनी पसंती दिल्याचं चित्र आहे. कंगना रणौत ते अमोल कोल्हे या सेलिब्रिटींचं नाणं खणखणीत वाजलं.

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. कंगनाला एकूण ५ लाख ३७ हजार २२ मतं मिळाली. या निवडणुकीत तिने ७४ हजारांचं मताधिक्य ठेवत विजय मिळवला.

मराठमोळा अभिनेता असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून शिरूरमधून उभे राहिले होते. अजित पवार गटाच्या आढळराव पाटील यांचा १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव करत अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. २ लाख ९३ हजार ४०७ मताधिक्य राखत सलग तिसऱ्यांदा त्या खासदार झाल्या आहेत.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हाही तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. या निवडणुकीत त्यांना ६ लाख ५ हजार ६४५ मतं मिळाली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती.

अभिनेता रवी किशन यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून विजय मिळवला. १ लाख ३ हजार ५२६ मताधिक्य राखत एकूण ५ लाख ८५ हजार ८३४ मत मिळवत ते विजयी झाले.

भाजपाच्या तिकिटावर भोजपुरी अभिनेता मनोज तिवारींनी दिल्लीत निवडणुक लढवली होती. ८ लाख २४ हजार ४५१ मतं मिळवत त्यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमारचा पराभव केला.

टीव्हीवरच्या रामानेही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लोकांची मनं जिंकली आहेत. भाजपच्या तिकीटावर मेरठमधून निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला.