Fifa World Cup : केरळ ते कतार! पाच मुलांची आई Messi ची 'डाय हार्ट' फॅन, अर्जेंटिनाला सपोर्ट करण्यासाठी 'OOLU' सोबत करतेय ट्रिप By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:49 PM 2022-11-26T16:49:35+5:30 2022-11-26T16:51:28+5:30
Fifa World Cup 2022 : कतारमधील वातावरण आता फुटबॉलमय झालं आहे... जगातील ३२ अव्वल संघ येथे दाखल झाले आहेत आणि त्यांना चिअर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने फॅन्सही कतारमध्ये दाखल झाले आहेत. Fifa World Cup 2022 : कतारमधील वातावरण आता फुटबॉलमय झालं आहे... जगातील ३२ अव्वल संघ येथे दाखल झाले आहेत आणि त्यांना चिअर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने फॅन्सही कतारमध्ये दाखल झाले आहेत. त्याच फॅन्समध्ये केरळच्या नाजी नौशी ( Naaji Naushi) या पाच मुलांच्या आईचाही समावेश आहे.
कतारमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नाजी यांनी १५ ऑक्टोबरला त्यांच्या SUV गाडीतून प्रवास सुरू केला. त्यांचा हा प्रवास केवळ लिओनेल मेस्सीला ( Leo Messi) लाईव्ह खेळताना पाहण्यासाठी आहे.
अर्जेंटिनाला पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून हार मानावी लागली, तरीही ३३ वर्षीय नाजी मेस्सीला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर जाणार आहेत. आज अर्जेंटिनाचा सामना मेक्सिकोविरुद्ध होणार आहे आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी अर्जेंटिनाला विजय आवश्यक आहे.
आणखी एक पराभव स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आणू शकते. ''मला फक्त माझा हिरो लिओनेल मेस्सी याला खेळताना पाहायचे आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाने मी दुःखी आहे, परंतु मला खात्री आहे की अर्जेंटिनाच्या मार्गातील तो छोटा अडथळा होता आणि आता ते वर्ल्ड कप जिंकणार आहेत,''असे नाजीने कतारमधील एका वृत्तपत्राला सांगितले.
मुंबईतून ओमान येथे बोटीने नाजी आपली SUV घेऊन रवाना झाली. त्यानंतर मस्कत येथून संयुक्त अरब अमिराती व्हाया हट्टा बॉर्डर असा तिने प्रवास केला. बुर्ज खलिफा पाहण्याचा अनुभव सांगताना हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे तिने सांगितले.
तिने तिच्या SUV ला 'OOLU' असे टोपण नाव ठेवले आहे. या गाडीत किचन आहे आणि छतावर टेंटची सोय आहे. OOLU हा मलयालम शब्द आहे आणि त्याचा अर्थ ती असा होतो.
नाजीने सोबत तांदुळ, पीठ, मसाले आणि अन्य पदार्थ घेतले आहेत. ''पैसे वाचवण्यासाठी मी स्वतःचं जेवण स्वतःच बनवते. त्यामुळे बाहेरचं जेवण जेऊन फुड पॉयझनिंगपासून मी स्वतःला वाचवतेही,''असे नाजीने सांगितले.