कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:39 PM 2021-09-09T13:39:33+5:30 2021-09-09T13:50:13+5:30
Nipah Virus: यात, एका गटातील चार माकडांना एक अथवा दोन डोस देण्यात आले. यानंतर, सर्व आठ माकडांना काहींना घशातून आणि काहींना नाकातून निपाह विषाणू देण्यात आला. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यामुळे देशाची चिंता वाढली आहे. मात्र यातच, आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या चमूने एक दिलासादायक माहिती दिली आहे. कोविशील्ड सारखी लस निपाह व्हायरसमध्ये रामबाण ठरू शकते, असे दावा संशोधकांच्या या चमूने केला आहे. (England vaccine like covishield can compete with nipah read big things)
यासंदर्भात शास्त्रज्ञांनी माकडांवर यशस्वी प्रयोग केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी आठ आफ्रिकन माकडांवर याची चाचणी केली. या चाचणीत वैज्ञानिकांनी सीएचएडीओएक्स-1 एनआयव्ही (कोविशील्ड सारखी लस)चा वापर केला.
यात, एका गटातील चार माकडांना एक अथवा दोन डोस देण्यात आले. यानंतर, सर्व आठ माकडांना काहींना घशातून आणि काहींना नाकातून निपाह विषाणू देण्यात आला.
यानंतर, 14 दिवसांनी या माकडांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. सर्व माकडांची निपाह विषाणूची चाचणी करण्यात आली. यात, ज्या माकडांना लस देण्यात आली होती, त्यां माकडांमध्ये निपाह व्हायरसची कुठलीही लक्षणे दिसून आली नाही.
यांपैकी ज्या माकडांना लस देण्यात आली होती, त्या माकडांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. तसेच ज्या माकडांना लस देण्यात आली नव्हती, त्या माकडांमध्ये निपाह विषाणूची लक्षणे दिसून आली.
...यामुळे, या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे, की लस निपाह विषाणूपासून बचाव करण्यात प्रभावी ठरू शकते. परिणाम समोर आल्यानंतर, यावर आणखी अध्ययन केले जात आहे.