Lyudmila Pavlichenko Women Sniper of Ukraine: पुन्हा जागी झाली 'ल्यूडमिला'! महिला स्नायपरने तेव्हा ३०९ नाझी सैनिकांना टिपलेले, जर्मनीचे स्वप्न भंगलेले By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:25 PM 2022-03-01T13:25:28+5:30 2022-03-01T13:34:26+5:30
Women Sniper of Ukraine War Story: वय अवघे २४ वर्षे. १५ व्या वर्षीच आई झालेली. तिने जर्मन सैनिकांना एवढे नामोहरम केलेले की त्यांना पुढे पाऊल टाकणेही कठीण करून ठेवलेले. या महिलेने ३०९ जर्मन सैनिकांना टिपले होते. रशियन फौजांचे सुरुवातीचे हल्ले बेकार ठरवत इंच इंच जागा लढविणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांना जग सलाम ठोकू लागले आहे. यामुळे रशियाने कुमक मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली असून कीव बाहेर तब्बल ६४ किमी रशियन सैन्याच्या वाहनांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. यामुळे युक्रेनच्या सैन्याला मदत करण्यासाठी महिला सैनिकही आता रणांगणात उतरल्या आहेत. या घणघोर युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धाची आठवण ताजी झाली आहे. ती 'ल्यूडमिला' पुन्हा जागी झाल्याचे सांगितले जात आहे.
युक्रेन एक हरलेले युद्ध संपूर्ण ताकदीने लढत आहे. युक्रेनच्या सैन्यात १७ टक्के महिला आहेत. या महिला सैनिकांनी आता मोर्चा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ८० वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा लिहिला जाणार आहे. कदाचित ती ल्यूडमिला पुन्हा जन्म घेईल. कोण होती ती ल्यूडमिला...चला जाणून घेऊया युक्रेनच्या लढवय्या महिला स्नायपरची कहानी.
''जर तू सापडली तर आम्ही तुझ्या शरीराचे ३०९ तुकडे तुकडे करून हवेत उडवू'', अशी शपथ जर्मनीच्या सैन्याने घेतली होती. परंतू, दुसरे महायुद्ध संपले, तरी नाझी सैन्याची ही इच्छा कदापिही पूर्ण झाली नाही. परंतू ल्यूडमिला पुढची अनेक वर्षे जर्मनींच्या जखमांवर मीठ रगडत राहिली.
वय अवघे २४ वर्षे. १५ व्या वर्षीच आई झालेली. तिने जर्मन सैनिकांना एवढे नामोहरम केलेले की त्यांना पुढे पाऊल टाकणेही कठीण करून ठेवलेले. या महिलेने ३०९ जर्मन सैनिकांना टिपले होते.
१९४०-४१ चे ते वर्ष होते. महायुद्ध 1939 ते 1945 या काळात लढले गेले. तेव्हा सोव्हिएत संघ होता. आता ज्या कीवमध्ये रशियन सैन्य बॉम्बवर्षाव करतेय तिथे तेव्हा हिटलरच्या फौजा घुसल्या होत्या. तेव्हाही कीव लढत होते. या रणांगणात एक २४ वर्षीय महिला उतरली होती. अस्सल नेमबाज. तिने गाजवलेल्या पराक्रमाचे किस्से आजही चर्चिले जातात. फक्त नव्या पीढीसमोर ती आज पुन्हा आली आहे.
ल्यूडमिला पवलिचेंको असे तिचे नाव होते. तिला जगाने आजवरची सर्वात खतरनाक महिला स्नायपर म्हणून गौरव केला. तशी साहसी महिला स्नायपर आजवर कोणत्याही देशाला लाभली नाही.
सोवियत संघाकडे तेव्हा TOZ-8 .22 कैलिबर टारगेट राइफल होत्या. आपल्याकडे जसे कट्टे सापडतात तसे तेव्हा तिथे या रायफली सापडायच्या. तेव्हा खेळासाठी तिचा वापर व्हायचा. ल्यूडमिलाला नेमबाजीची आवड होती. पुढे हीच आवड तिला नाझी फौजांविरोधात लढण्याच्या कामी आली. तिने शस्त्रांच्या फॅक्टरीतही काम केले होते.
यामुळे ती स्नायपर स्कूल आणि नंतर सोवियत संघाच्या रेड आर्मीत भरती झाली. जून 1941ला हिटलरने सोव्हिएत वर हल्ला केला. पण तिला दोन महिन्यांनंतर संधी मिळाली. यासाठी तिला दोन जर्मन आणि रोमन सैनिकांची शिकार करायची होती. यासाठी तिने चार गोळ्यांत या दोन्ही सैनिकांना ठार केले.
तिला स्नायपर म्हणून तैनात करण्यात आले. परंतू तेव्हा तिच्याकडे बंदुकांच्या गोळ्यांची कमतरता होती. तिने १७ गोळ्यांमध्ये १६ जर्मन सैनिकांना टिपले. यासाठी तिने मोठा माईंडगेम सुरु केला. ती जर्मन सैनिकांमध्ये खळबळ उडविण्यासाठी त्यांच्या पोटात गोळी मारायची. पुढच्याच दिवशी तिने आणखी दहा सैनिक मारले.
२००० महिला स्नायपर्सनी मिळून १२ हजार जर्मन सैनिकांना टिपले होते. या २००० पैकी ५०० स्नायपरच जिवंत राहिल्या होत्या. त्यात ही ल्यूडमिला देखील होती. ती एवढी फेमस झालेली की 1942 ते1945 या काळात सोव्हिएत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी तिचे लाखांहून अधिक पोस्टर लावण्यात आले होते.
युद्ध संपल्यानंतर स्टलिनने तिला मोठे पद दिले. तिला अमेरिकेला पाठविले. ल्यूडमिला ही पहिली अशी रशियन महिला होती, जिच्या स्वागतासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूजवेल्ट आणि त्यांची पत्नी एलेनोर रूजवेल्ट आले होते. त्यांनी तिला अमेरिकेतच थांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ती पुन्हा रशियाला निघून गेली.
अशा बातम्या देखील ल्युडमिलाबद्दल येत राहिल्या की सोव्हिएत युनियनने तिला प्रचाराचा एक भाग बनवले. स्नायपर म्हणून तिचे यश अतिशयोक्तीपूर्ण दाखविले. काहीही असले तेव्हाचा तो काळ असा होता, की त्याचे कोणी पुरावे देऊ शकत नव्हता, की दावे खोडूनही काढू शकत नव्हता. अशाच ल्युडमिलांची आज युक्रेनला गरज आहे.