Nato Response Force: नाटोने पहिल्यांदाच खतरनाक युनिट केले अॅक्टिव्हेट; कीवमध्ये उतरवण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:01 PM 2022-02-26T18:01:01+5:30 2022-02-26T18:08:07+5:30
Nato Response Force Activated: रशियाने आक्रमण केल्यास नाटो आणि अमेरिका चोख प्रत्यूत्तर देईल अशा फुशारक्या गेल्या महिनाभरापासून मारण्यात येत होत्या. परंतू जेव्हा प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा नाटोने युक्रेनला वाऱ्यावर सोडले. यामुळे जगभरातून नाटो आणि अमेरिकेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. रशियाविरोधात ऐनवेळी युक्रेनच्या मदतीला जाण्यापासून हात वर करणाऱ्या अमेरिका, युरोपीय अशा ३० देशांच्या संघटनेची जगभरात पुरती नाचक्की झाली आहे. यामुळे ही जगातील दरारा कमी होण्याच्या भितीने का होईना नाटोने आपले खतरनाक युनिट अॅक्टिव्हेट केले आहे. या सैन्याची तैनाती कीव वाचविण्यासाठी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रशियाने आक्रमण केल्यास नाटो आणि अमेरिका चोख प्रत्यूत्तर देईल अशा फुशारक्या गेल्या महिनाभरापासून मारण्यात येत होत्या. परंतू जेव्हा प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा नाटोने युक्रेनला वाऱ्यावर सोडले. यामुळे जगभरातून नाटो आणि अमेरिकेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. आता उशिरा का होईना नाटोला अक्कल आली आहे. नाटोने रिस्पॉन्स फोर्सला तयार राहण्याचे आदेश दिले आहे.
नाटो रिस्पॉन्स फोर्समध्ये तीस देशांचे सर्व प्रकारची ट्रेनिंग घेतलेले ४०००० सैनिक आहेत. हे सैनिक नाटोसाठी केवळ १२ महिनेच तैनात असतात. सध्या हे सैन्य फ्रान्समध्ये आहे. ही फोर्स जर युक्रेनमध्ये उतरवण्यात आली तर रशियासाठी मोठा झटका असणार आहे. नाटोने सध्या निम्म्याच सैन्याला आदेश दिले आहेत.
नाटो रिस्पॉन्स फोर्स (एनआरएफ) हे अनेक प्रकारच्या मिलिट्री विभागांतून बनविण्यात आले आहे. यामध्ये तातडीने कारवाई करणारे सैनिक आहेत. या फोर्सची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली होती. यानंतर २००३ मध्ये मंजुरी मिळाल्यावर त्याचे स्वरूप ठरविण्यात आले. २००४ मध्ये प्रत्यक्षात घोषणा करण्यात आली.
नाटोने तेव्हा आपल्याकडे शीतयुद्धासाठी लष्कर नसेल असे जाहीर केले होते. परंतू आपल्या मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी एक फोर्स असेल, जी त्यांच्यावर कोणतेही संकट आले तर धावून जाईल असे म्हटले होते. आ एनआरएफमध्ये जमिनीवर, हवेत आणि पाण्यात युद्ध करतील असे विषेश ट्रेनिंग असलेले सैन्य आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षित सैन्य अभावानेच एका देशाकडे असेल.
या फोर्सचा वापर शिक्षण, ट्रेनिंग आणि मिलिट्री एक्सरसाईज, नैसर्गिक संकटांमध्ये मदतीसाठी देखील केला जातो. या फोर्सची जबाबदारी सुप्रीम अलाईड कमांडर युरोप (SACEUR) च्या खांद्यावर आहे. एनआरएफला गेल्या वर्षी अफगानिस्तानात देखील तैनात करण्यात आले होते. या दलातील सैनिक दर वर्षाला रोटेट होत राहतात.
हे सैनिक फक्त १२ महिनेच नाटोसाठी काम करतात. या फोर्सची एवढी ताकद आहे की, ते दोन दिवसांत जगातील कोणत्याही ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. एनआरएफचे मुख्यालय देखील रोटेट होत असते. या वर्षी नेदरलँडमध्ये तर दुसऱ्या वर्षी इटलीच्या नेपल्समध्ये असते.
नाटोची दुसरी फोर्स या पहिल्या फोर्सने काम तमाम केले की तैनात केली जाते. हिला इनिशियल फॉलो-ऑन फोर्सेज ग्रुप म्हटले जाते. यामध्ये नाटोचे छोटे छोटे ग्रुप असतात.
महत्वाचे म्हणजे यंदा फ्रान्स या दोन्ही फोर्सचे नेतृत्व करत आहे. आणि फ्रान्सने युक्रेनला लष्करी सामुग्री, शस्त्रास्त्रांची मदत पाठविली आहे.
हे सारे वाटेत असून उद्या पर्यंत कीवमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे जर नाटोने आपले सैन्यदेखील उतरविले तर रशियाला सपाटून मार खावा लागण्याची शक्यता आहे.