गळाभेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी मोदींना दाखवलं असं काही, दोन्ही नेते झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:54 PM2024-08-23T17:54:56+5:302024-08-23T18:01:45+5:30

PM Narendra Modi In Ukraine: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा पोलंडचा दौरा आटोपून युक्रेनमध्ये पोहोचले आहे. ट्रेनने प्रवास करून युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर झेलेन्स्की यांनी मोदींना असं काही दाखवलं ज्यामुळे तेथील वातावरण भावूक झालं.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा पोलंडचा दौरा आटोपून युक्रेनमध्ये पोहोचले आहे. ट्रेनने प्रवास करून युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर झेलेन्स्की यांनी मोदींना असं काही दाखवलं ज्यामुळे तेथील वातावरण भावूक झालं.

त्याचं झालं असं की मोदींची गळाभेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे त्यांना किव्हमधली बॉम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाजवळ घेऊन गेले. तेव्हा दोन्ही नेते भावूक झाले.

तिथे टीव्हीवर स्फोटानंतरची दृश्ये दाखवण्यात आली होती. पंतप्रधान मोदी भावूकपणे ही दृश्य पाहत होते. तर झेलेन्स्की यांचा चेहराही यावेळी उतरलेला होता.

तेव्हा नरेंद्र मोदी हे झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी सांगताना दिसत होते.

टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या दृश्यांमध्ये मे २०२२ असं लिहिलेलं होतं. त्या दिवशी खारकिव्हमध्ये झालेल्या बॉम्बवर्षावामध्ये एका मुलाचाही मृत्यू झाला होता. हे फोटो पाहून दोन्ही नेते भावूक झाले.