डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:56 PM2022-02-24T12:56:46+5:302022-02-24T13:38:35+5:30

Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे.

रशियानं युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. युक्रेनमधील नागरिक सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असतील याची कल्पना देखील आपण करु शकत नाही. डोक्यावरुन घिरट्या घालणारी लढाऊ विमानांच्या भीतीच्या सावटाखाली नागरिक जीव मूठीत घेऊन घराघरात दडून बसले आहेत.

युक्रेनमध्ये सध्या धुमाकूळ उडाला असून काही ठिकाणी बॉम्बहल्ले झाल्याचेहीची छायाचित्र समोर आली आहेत.

युक्रेनच्या कीव, डोनबास, ओडेसासह अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

युक्रेननमध्ये सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात येत आहे. हा फोटो युक्रेनची राजधानी कीव येथील मेट्रो स्थानक परिसरातील आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण आता पुन्हा पाहू शकणार आहोत की नाही याची कल्पना नागरिकांना नाहीय. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणि काळजात भीतीचं वातावरण संपूर्ण युक्रेनमध्ये आहे. (फोटो- एएफपी)

युक्रेनची राजधानी कीवमध्ये एअर स्ट्राइकसाठीचे सायरन वाजवून अलर्ट केलं जात आहे. कीव शहरात सकाळपासूनच बॉम्बस्फोटांचे आवाज नागरिकांना ऐकू येत आहेत.

रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव शहराला लक्ष्य केलं जात असल्यामुळे अनेक जण शहर सोडून जाण्याचाही निर्णय घेताना दिसत आहेत.

बँका बंद असल्यानं अनेक ठिकाणी एटीएमबाहेर नागरिक गर्दी करू लागले आहेत.

युक्रेनचे नागरिक ठिकठिकाणी आणि आपल्या घरोघरी युद्ध लवकर संपावं, शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

रशियाच्या युद्धाच्या निर्णयामुळे युक्रेनमध्ये येणाऱ्या प्रवासी विमानांना धोका निर्माण होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर युक्रेननं देशाच्या हवाई मार्गांवर बंदी घातली आहे.

युक्रेनची राजाधानी कीव शहराला रशियाकडून लक्ष्य केलं जात असल्यानं शहराबाहेर जाणाऱ्यांची गर्दी, ठिकठिकाणी ट्राफिक जाम

रशियानं केलेल्या हल्ल्यात अनेक घरं, वाहनांचं नुकसान झाल्याचं दृश्यांमधून दिसून येत आहे.