Russia Ukraine War: 'या' तारखेपासून रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम; भविष्यवाणी ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:46 AM2022-03-03T11:46:59+5:302022-03-03T12:05:33+5:30

Russia Ukraine War Impact on India: सध्या जगभरात रशिया-यूक्रेन युद्धाची चर्चा सुरू आहे. मात्र ग्रहमानात घडणाऱ्या मोठ्या घडामोडींमुळे या युद्धाचा भारतावरही परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्योतिषशास्त्रात राहुला पापी ग्रह मानले जाते. त्याच्या स्थितीतील बदलामुळे अनेक मोठे बदल होतात. १७ मार्च २०२२ रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार आहे. १८ महिन्यांनंतर राहूचे राशी बदल संपूर्ण जगासाठी मोठे बदल घडवून आणतील.

साहजिकच भारत यापासून दूर राहणार नाही. मार्च २०२२ मध्ये होणार्‍या या राहू संक्रमणाचा देशाच्या राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावरही परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे ग्रह नेहमी विरुद्ध दिशेने फिरतात.

ते १८ महिन्यांत राशी बदलतात. १७ मार्च रोजी राहू वृषभ राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल, जिथे तो पुढील दीड वर्ष राहील. राहूच्या मेष राशीत प्रवेशाच्या वेळी जन्मकुंडलीचे विश्लेषण केले तर शनि, मंगळ आणि शुक्र या तीन ग्रहांची युती होत आहे.

या ग्रहमानामुळे संपूर्ण जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम भारतावरही होईल. ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीत राहूनं प्रवेश केल्यानंतर खाण्यापिण्याचे संकट येईल. त्यामुळे राहू मेष राशीत प्रवेश करताच सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. युक्रेन आणि रशिया हे जगातील सर्वात मोठे गहू उत्पादक देश असल्याने आणि हे दोन्ही देश युद्धभूमीत आहेत.

या परिस्थितीमुळे धान्याच्या किमती वाढतील, ज्यामुळे अनेक देशांमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते. तसेच राहूच्या संक्रमणामुळे भारतात अवकाळी पाऊस पडेल, ज्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. एप्रिलमध्ये मेष राशीतून कुंभ राशीत शनी-मंगळ आणि जूनमध्ये मेष राशीत राहू-मंगळाची युती शेअर बाजारात खूप अस्थिरता आणू शकते.

या काळात अत्यंत हुशारीने गुंतवणूक करावी. राहूचे संक्रमण भारताच्या राजकारणातही गोंधळ निर्माण करू शकते. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मोठे नेते आणि अधिकाऱ्यांशी संबंधित अप्रिय घटना घडू शकतात. याशिवाय पूर आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचीही शक्यता असल्याचं दिसून येते.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन आठवड्यांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. बुधवारी सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ५२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. युद्ध सुरूच राहिले, तर सोने ५५ हजारांपर्यंत जाऊ शकते.

भारताला रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणालीची पहिली खेप मिळाली आहे, परंतु इतर चार वितरित करणे बाकी आहे. आतापर्यंत रशियाकडून डिलिव्हरी होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसत नाहीत, परंतु युक्रेनवरील हे संकट दीर्घकाळ चालले तर निश्चितच चिंतेची बाब ठरू शकते.

रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक बाजारपेठेला धोका कायम आहे. जगभरातील शेअर बाजार वाईट काळातून जात आहेत. काही देशांच्या चलन मूल्यावर परिणाम झाला आहे.