Russia Ukraine War: रणगाड्यांची चाल, विमानांची घरघर, मिसाईल हल्ल्यांनी युक्रेन हादरले, युद्धाचे भयावह फोटो समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:20 PM2022-02-24T17:20:32+5:302022-02-24T17:26:38+5:30

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. मात्र पुतीन या कारवाईला केवळ स्पेशल मिलिट्री ऑपरेशन म्हणत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये अनेक ठिकाणी भीषण स्फोट झाले असून, युद्धक्षेत्रातील भयावह फोटो समोर आले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. मात्र पुतीन या कारवाईला केवळ स्पेशल मिलिट्री ऑपरेशन म्हणत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये अनेक ठिकाणी भीषण स्फोट झाले असून, युद्धक्षेत्रातील भयावह फोटो समोर आले आहेत.

युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. तेथील संपूर्ण कायदे व्यवस्था लष्कराने हाती घेतली आहे. किव्ह एअरपोर्ट रिकामा करण्यात आला आहे.

रशियाने किव्हमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रशियन सैनिक क्रिमियाच्या वाटेने युक्रेनमध्ये घुसत आहेत. सीमेवर दोन लाखांपेक्षा अधिक रशियन सैनिक तैनात आहेत.

रशियन मिसाईल हल्ल्यामुळे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. यादरम्यान, युक्रेनने रशियन फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे.

दरम्यान युक्रेनने देशातील युद्धजन्य स्थितीमुळे देशामध्ये प्रवासी विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या विमानाला रिकाम्या हाती मागे फिरावे लागेल.

रशियाने सांगतले की, आमच्या निशाण्यावर युक्रेनमधील शहर नाही आहेत. आमची शस्त्रे युक्रेनचे तळ, एअरफिल्ड, वॉर डिफेन्स फॅसिलिटीज आणि एव्हिएशनला उदध्वस्त केल आहे. युक्रेनच्या जनतेला काही धोका नाही आहे.

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या संसदेने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. आणीबाणीच्या घोषणेनंतर युक्रेनने आपल्या ३० लाख नागरिकांना त्वरित रशिया सोडण्याची सूचना दिली आहे.