Russia-Ukraine War : युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:03 PM2022-02-28T14:03:34+5:302022-02-28T14:08:28+5:30

Russia-Ukraine War : काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये परिस्थिती अतिशय वेगळी होती. परंतु आता युक्रेनचं दृश्य भयावह दिसत आहे.

Russia-Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला अनेक दिवसांचा कालावधी लोटला. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याने युक्रेनची राजधानी कीव अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहे. सर्वत्र विनाशाच्या खुणाही दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी युक्रेनची राजधानी कीवमधील परिस्थिती अतिशय निराळी होती. युक्रेनमधील लोक आनंदानं आपलं जीवन जगत होते. परतु रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर येथील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता या ठिकाणी रस्त्यांवरही सामसूम दिसत आहे.

हा फोटो कीवमधील लोबानोवस्की एव्हेन्यूचा आहे. २६ फेब्रुवारी रोजी रशियानं या ठिकाणी हल्ला केला होता. रशियन सैन्यानं चिमुरड्यांनाही सोडलं नाही हे बाहेर पडलेलं वही आणि खेळणी दाखवून देत आहेत.

कीवच्या रस्त्यांवर सध्या अशी दृश्ये सामान्य आहेत. सर्वत्र ढिगारा पसरलेला आहे. तर आपले प्राण वाचवण्यासाठी लोकांनी सुरक्षित घरांमध्ये आश्रय घेतला आहे.

रशियाच्या हल्ल्यात इमारतीला मोठं नुकसान झालं. या ठिकाणी आपल्या प्रियजनांच्या खुणा शोधताना एक व्यक्ती.

२६ फेब्रुवारीला रशियानं या इमारतीवर क्षेपणास्त्र डागलं होतं. संपूर्ण शहरात रशियाकडून अनेक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.

या युद्धात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तसंच यामध्ये अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीचंही नुकसान झालं आहे.

युक्रेनची राजधानी कीवच्या आकाशातही धुराचे लोट दिसून येत आहे. दरम्यान, यामध्ये युक्रेनला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं आहे.