Russia Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर, दोन मुलं अन् अशी आहे 'फॅमिली लाइफ'...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 03:01 PM2022-02-25T15:01:24+5:302022-02-25T15:08:01+5:30

युक्रेनवर रशियावर हल्लानं केला आहे. यात अनेकांचा जीव गेला आहे. रशियाच्या हल्ल्यापुढं युक्रेनचे वलोडिमीर जेलेंस्की देखील असहाय्य झाले आहेत. तरीही ते 'में झुकुंगा नहीं' म्हणत शेवटपर्यंत लढा देणार असल्याचं म्हणाले आहेत. युक्रेनच्या या युवा राष्ट्रपतींची कुटुंबाचीही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपण जाणून घेऊयात...

शेवटच्या श्वासापर्यंत रशियाचा मुकाबला करत राहणार अशी कणखर भूमिका घेतलेल्या युक्रेनच्या राष्ट्रपती वलोडिमीर जेलेंस्की यांची सध्या जोरदार चर्चा आहे. ते व्हिडिओच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. तसंच जगाकडे रशियाविरोधात मदतीची मागणीही करत आहेत.

नुकत्याच एका व्हिडिओ संदेशातून युक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. या व्हिडिओत ते भावूक आणि कुटुंबीयांची काळजी व्यक्त करताना दिसून आले. जेलेंस्की यांनी म्हटलं की, रशियाच्या निशाण्यावर सर्वात आधी मी आणि दुसऱ्या स्थानावर माझं कुटुंब आहे.

राष्ट्रपती जेलेंस्की सोशल मीडिया चांगलेच सक्रिय असतात. ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे क्षण शेअर करत असतात. ४४ वर्षीय युक्रेनी वलोडिमीर जेलेंस्की यांचं आयुष्य अनेस संघर्ष कहाण्या आणि इतर नेत्यांच्या तुलनेत खूप अडचणीचं राहिलं आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

युक्रेनच्या प्रथम महिला म्हणजेच राष्ट्रपती वलोडिमीर जेलेंस्की यांची पत्नी यांचं नाव ओलेना वलोडिमिरिवना जेलेंस्का असं आहे. ओलेना या आर्किटेक्ट, स्क्रीन रायटर आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये जेलेंस्का यांना फोकस मासिकाद्वारे जगातील सर्वात प्रभावशाली युक्रेनियनच्या यादीत ३० वं स्थान देण्यात आलं होतं.

२००३ साली ओलेना जेलेंस्का आणि राष्ट्रपती वलोडिमीर यांचा विवाह झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार ओलेना यांनी क्रिवी रिह नॅशनल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी सिविल इंजिनिअरिंगमध्येही पदवीचं शिक्षण घेतलं आहे. अर्थात त्यांनी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट फिल्डमध्ये खूप काम केलेलं नाही.

ओलेना या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. बऱ्याचदा त्यांना सामाजिक कार्यात सहभागी होताना पाहिलं आहे. कोरोना महामारीच्यावेळी त्यांनी खूप मोठं समाजकार्य उभं केलं होतं.

राष्ट्रपती वलोडिमीर आणि ओलेना यांना दोन मुलं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं नाव ऑलेक्झेंड्रा आणि मुलाचं नाव किरिलो असं आहे. राष्ट्रपती वलोडिमीर अनेकदा त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.

१५ जुलै २०१९ मध्ये राष्ट्रपती वलोडिमीर यांनी मुलीच्या १५ व्या वाढदिवशी तिचा एक फोटो शेअर केला होता. आता त्यांची मुलगी १७ वर्षांची झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार वलोडिमीर यांच्या मुलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती आजवर समोर आलेली नाही. त्यांच्या मुलाचा जन्म २०१३ मध्ये झाला असून तो आता ८ ते ९ वर्षांचा आहे.