Russia Ukraine War: यूक्रेनला मिळणार बाहुबलीच्या ‘भल्लालदेव सारखं शस्त्र’ रशियावर घातक हल्ल्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:36 PM2022-03-23T16:36:19+5:302022-03-23T16:40:04+5:30

रशिया-यूक्रेन यांच्या युद्धाला १ महिना होत आला तरीही यूक्रेन रशियासमोर झुकण्यास तयार नाही. बलाढ्य रशिया यूक्रेनवर सहजपणे कब्जा करेल असं सांगितले जात होते. परंतु यूक्रेनच्या कडवट प्रतिकारामुळे अद्यापही रशियाला जिंकता येत नाहीत.

त्यात अमेरिकेसह नाटो देश यूक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करत आहे. त्यात आता अमेरिकेने यूक्रेनला स्विचब्लेड ड्रोन्स(Switchblade Drones) दिले आहेत. या ड्रोनला कामीकेज किलर ड्रोन्सही म्हटलं जाते. या ड्रोनच्या मदतीनं यूक्रेन रशियन टँकर, लष्करी वाहनं, बंकर आणि सैनिकांवर संकट निर्माण करू शकते.

हा ड्रोन केवळ स्फोट करत नाही तर अनेक जवानांना गंभीर इजा पोहचवू शकते. वेगवान गतीसह विंग्सने इजा पोहचण्याचा धोका आहे. नाव न छापण्याच्या अटीवर यूरोन्यूजला अमेरिकन अधिकारी म्हणाले की, Ukraine ला अमेरिकेकडून १०० टॅक्निकल स्विचब्लेड ड्रोन्स पाठवले आहेत.

हे युद्धासाठी असलेले असं हत्यार आहे जे कुठल्याही संकटात उपयुक्त ठरू शकते. काय आहे कामीकेज ड्रोन्स?(Kamikaze Drones) कामीकेज किलर ड्रोन्स अथवा स्विचब्लेड ड्रोन्स हा एकावेळी रिमोटनं कंट्रोल्डनं उडणारा बॉम्ब आहे.

सहजपणे कुठेही त्याचा वापर केला जातो.यातील कॅमेऱ्यामुळे लपलेल्या टार्गेटवरही हल्ला करता येऊ शकतो. हा ड्रोन जंगलात, डोंगरावर किंवा इमारतींवर लपलेल्या शत्रूंना शोधून आत्मघातकी हल्ला करू शकतं. हा ड्रोन शत्रूला ओळखून स्फोट घडवते.

त्याचसोबत यातील धारदार ब्लेडने गंभीर जखमाही होऊ शकतात. जसं बाहुबली सिनेमातील भल्लालदेवच्या रथावर समोर फिरणारे स्विचब्लेड शत्रूला कापून टाकते तसेच हे ड्रोन काम करते. स्विचब्लेड ड्रोन टँक उडवू शकतात? अमेरिकन कंपनी Aero Vironment ने दोन प्रकारचे स्विचब्लेड ड्रोन तयार केले आहेत.

सर्वात शक्तिशाली स्विचब्लेड ड्रोन २३ किलो स्विचब्लेड-६०० आहे. तो ४० मिनिटे उडू शकतो. तो ताशी १८५ किलोमीटर वेगाने जमिनीवर कोसळते. त्यात असलेल्या स्फोटकांच्या मदतीने तो टँक आणि चिलखती वाहने उडवू शकतो.

कामीकेज किलर ड्रोन कसं कामं करतं? लाँग रेंज प्रीडेटर ड्रोन आकाराने लहान असतात. ते क्षेपणास्त्रांप्रमाणे प्रक्षेपित केले जातात. जसे मोर्टार सोडले जाते ते रॉकेटप्रमाणे लॉन्च पॅडमधून बाहेर पडते. हवेत गेल्यावर पंख उघडतात.

त्यानंतर ते ऑपरेट करणारी व्यक्ती रिमोटवर लक्ष ठेवतो. टीव्हीच्या स्क्रीनकडे बघत तो टार्गेटच्या दिशेने झेप घेतो. लक्ष्य दिसताच ड्रोनच्या रूपातील क्षेपणास्त्राचा स्फोट होतो. स्विचब्लेडचा अर्थ काय आहे? Switchblade या शब्दाने घाबरण्याची गरज नाही. आपल्या देशात, ८० च्या दशकातील चित्रपटांमध्ये याचा भरपूर वापर केला गेला आहे.

रामपुरी चाकू हा स्विचब्लेडचा नमुना आहे. बटण दाबून त्याच्या शेलमधून बाहेर पडणाऱ्या चाकूला स्विचब्लेड म्हणतात. हे स्वयंचलित फ्लिक चाकू असू शकतात. हे नियमित फोल्डरसारखे दिसू शकते. ते भल्लालदेवाच्या रथाच्या चाकासारखे असू शकतात.