लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:57 PM2020-07-10T12:57:51+5:302020-07-10T13:21:03+5:30Join usJoin usNext कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने एका जोडप्याला मालामाल केलं आहे. जगातील सर्वच देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे अनेक देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. काही देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमध्ये धक्कादायक घटना समोर येत असतानाच आता एक भन्नाट घटना समोर आली आहे. कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने एका भारतीय जोडप्याला मालामाल केलं आहे. शिबू पॉल आणि लिननेट जोसेफ असं या दाम्पत्याचं नाव असून ते ब्रिटनच्या नॉटिंघममध्ये राहतात. कोरोनामुळे शिबू पॉल यांची नोकरी गेली मात्र नशिबाने त्याला या संकटाच्या काळात एक सुखद धक्का देत श्रीमंत केलं आहे. शिबू पॉल आणि लिननेट जोसेफ असं या दाम्पत्याचं नाव असून ते ब्रिटनच्या नॉटिंघममध्ये राहतात. कोरोनामुळे शिबू पॉल याी नोकरी गेली मात्र नशिबाने त्याला या संकटाच्या काळात एक सुखद धक्का देत श्रीमंत केलं आहे. कोरोनामुळे शिबू यांची काही दिवसांपूर्वीच नोकरी गेली. मात्र स्पर्धेमुळे त्यांचं आता आयुष्यच बदललं आहे. (सर्व फोटो - credit Botob.com-Youtube-Videos) शिबू यांना कारसोबतच 18.94 लाख प्राईझ मनी म्हणून देण्यात आले आहेत. यामुळे ते फारच आनंदी झाले आहेत. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये राहणारे शिबू हे मूळचे भारतीय आहेत. केरळच्या कोच्चीमध्ये ते एका स्टुडिओत साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीच ते ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले आहेत. कोरोनाच्या संकटात शिबू बेरोजगार झाले होते. याच दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. तसेच BOTB साठी 1800 रुपयांची तीन तिकिटे खरेदी केली. 'मी याआधी तीन वेळा या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र याचं विजेता होईन असा विचार नव्हता केला. गेल्या वेळीही फॉर्म भरला पण नंतर हे पूर्णपणे विसरून गेलो होतो' असं शिबू यांनी सांगितलं. "अचानक आमच्या दरवाजाची बेल वाजली आणि समोर एक नवी कोरी लेम्बोर्गिनी उर्स कार आणि प्राईझ मनी होतं. सुरुवातीला विश्वासच बसला नाही. यासाठी देवाचे आभार मानतो" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचं विजेते झालो हे समजल्यावर खूप आनंद झाला. सुरुवातीला धक्का बसला पण यानंतर खूप जास्त खूश झालो असं जोडप्याने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. Read in Englishटॅग्स :कारभारतकेरळcarIndiaKerala