Police seal on hand : दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:05 PM2021-04-06T16:05:45+5:302021-04-06T16:22:51+5:30

Police seal on hand : मास्क नसलेल्या लोकांना जवळपास ३० मिनिटं जेलमध्ये ठेवण्यात आलं

शासनानं दिलेल्या गाईड लाईन्सचं लोकांकडून पालन केलं जातं आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यात पोलिसांनी कोरोनाच्या गाईडलाईन्सचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारलेला पाहायला मिळत आहे.

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये पोलिसांनी मास्क वापरत नसेल्यांना एक आगळी वेगळी शिक्षा दिली आहे. सोशल मीडियावर या शिक्षेचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

महामार्गावर तपासणीदरम्यान मास्क लावत नसलेल्या लोकांना पकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या हातावर एक शिक्का मारण्यात आला आहे. कोरोनादूत असं या शिक्क्यावर लिहिलं आहे.

इतकंच नाही तर मास्क नसलेल्या लोकांना जवळपास ३० मिनिटं जेलमध्ये ठेवण्यात आलं.

जेलमध्ये त्यांच्याकडून कोरोनाच्या सुरक्षेबाबत निबंध लिहून घेतला.

या अभियानात जिल्हाअधिकारी डॉ. पंकज जैन यांनी मास्क लावत नसलेल्या चालकांना कोरोना दूत असा शिक्का हातावर मारून या चालकांकडून निबंध लिहून घेतला.

कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे.