Taj Mahal: त्यांनी पत्नीला गिफ्ट दिला चक्क ताजमहाल, तीन वर्षांत बांधून झाला तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:42 PM 2021-11-20T23:42:03+5:30 2021-11-20T23:48:05+5:30
Taj Mahal : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे.
ताजमहाल हा बुऱ्हाणपूरमधून जाणाऱ्या ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर बांधला जाणार होता. मात्र काही कारणास्तव तो आग्रा येथे बांधला गेला. आनंद चौकसे यांना ताजमहाल बुऱ्हाणपूर येथे बांधला गेला नाही याची खंत होती. मात्र जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी पत्नीला ताजमहालप्रमाणेच अविस्मरणीय भेट देण्याचा प्रयत्न केला.
ताजमहालासारखे घर बांधण्यामध्ये अनेक अडथळे आले. मात्र आनंद प्रकाश चौकसे यांच्या अतूट विश्वासामुळे तंत्रज्ञांच्या पथकाने ताजमहालासारखे घर तयार करण्यात यश मिळवले. कन्सल्टिंग इंजिनियर प्रवीण चौकसे यांनी सांगितले की, आनंद चौकसे यांनी त्यांना ताजमहाल सारखे घर तयार करण्याचा कठीण टास्क दिला होता.
प्रवीण चौकसे यांनी सांगितले की, स्वत: आनंद चौकसे यांनी त्यांची पत्नी मंजुषा चौकसे आग्रा येछे ताजमहाल पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी इंजिनियर्सना तायमहालासारखे घर बांधण्यास सांगितले. इंजिनियर प्रवीण चौकसे यांनीही आग्रा येथे जाऊन ताजमहाल पाहिला. तसेच ताजमहालाच्या बांधकामाचे तंत्र आणि क्षेत्रफळाचे निरीक्षण केले.
प्रवीण चौकसे यांच्या म्हणण्यानुसार हे ताजमहालसारखे दिसणारे घर क्षेत्रफळ मिनारासह ९० बाय ९० चे आहे. बेसिक स्ट्रक्चर ६० बाय ६० चा आहे. तर डोम २९ फूट उंच ठेवण्यात आला आहे. ताजमहालासारख्या दिसणाऱ्या या घरामध्ये एक मोठा हॉल, दोन बेडरूम खाली आणि दोन बेडरूम वर बांधण्यात आले आहे. एक किचन, एक लायब्ररी आणि एक मेडिटेशन रूमसुद्धा बांधण्यात आला आहे.
घराच्या आतमध्ये करण्यात आलेले नक्षीकाम हे बंगाल आणि इंदूरमधील कलाकारांच्या मदतीने करण्यात आले आहे. तर घरातील फ्लोरिंग राजस्थानमधील मकराना येथील कारागिरांकडून करून घेण्यात आले. तर इनले चे काम आग्रा येथील कारागिरांकडून करून घेण्यात आले.
घरामध्ये असलेल्या फर्निचरचे काम सूरत आणि मुंबईतील कारागिरांनी तयार केले आहे. या घराला काही पुरस्कारही मिळाले आहेत.