woman lottery agent's honesty : भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:15 PM 2021-03-24T20:15:43+5:30 2021-03-24T20:54:11+5:30
A woman lottery agent is appraised for her honesty : चंद्रन यांनी एजेंट समिझाकडून समर बम्पर लॉटरीचे टिकिट रोखून ठेवायला सांगितले होते. याशिवाय लॉटरीच्या तिकिटाचे २०० रूपये नंतर देईन असंही सांगितलं होतं. केरळमध्ये प्रत्येकजण लॉटरी जिंकलेल्या एका महिलेविषयी चर्चा करत आहेत. अलुवा येथिल रहिवासी असलेल्या पी, के चंद्रन यांनी एजेंट समिझाकडून समर बम्पर लॉटरीचे टिकिट रोखून ठेवायला सांगितले होते. याशिवाय लॉटरीच्या तिकिटाचे २०० रूपये नंतर देईन असंही सांगितलं होतं.
नशिबानं साथ दिली आणि चंद्रनने ज्या तिकिटाचे पैसैही दिले नव्हते. तेच तिकिट ६ कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्राईजमध्ये जिंकले. सामिझा या मोहन पट्टिमोटम येथिल रहिवासी आहेत. दोन मुलांच्या आई असलेल्या ३७ वर्षीय समिझा आपले पती आणि मुलांसह राजगिरी येथिल एका रुग्णलयाजवळ आपला लॉटरीचा स्टॉल चालवतात.
समिझा यांनी रविवारी आपल्या काही लॉटरी ग्राहकांना फोन करून १२ तिकिट अजूनही विकली गेली नसल्याचं सांगितले. जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता असं त्या म्हणाल्या. यावेळी चंद्रन यांनी समिझा यांना सांगितले की, शेवटचा नंबर ६१४२ असलेलं तिकिट कोणत्याही परिस्थितीत विकू नका. त्या तिकिटाचे २०० रूपये मी तुला नंतर देईल.
रविवारी संध्याकाळी समिझा यांना कळले की, त्याच्याकडे असलेल्या तिकिटाला पहिलं बक्षिस मिळालं आहे. समिझानं पाहिलं की हे तिकिट चंद्रन यांनी बाजूला ठेवायला सांगितले आहे. त्यावेळी समिझा तात्काल त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांचे तिकिट त्यांच्या हवाले केलं.
चंद्रन, त्यांची पत्नी लिला, दोन मुली आणि एक मुलगा समिझा यांच्या इमानदारीचे कौतुक करत आहेत. चंद्रन कीझमाडू डॉन बॉस्को शाळेत गार्डनर आहेत. चंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून ते लॉटरीचं तिकिट विकत घेत होते. अनेकदा त्यांना लहान लहान बक्षिसं मिळायची. पण यावेळी मात्र त्यांना मोठं बक्षिस मिळालं.
समिझा यांनी सांगितले की, ''लॉटरीचे तिकिट विजेत्यांच्या हवाली केलं त्यानंतर मला खूप फोन आले. जास्तीत जास्त लोकांनी माझं कौतुक करण्यासाठी मला संपर्क केला होता.
पण लोकांना हे नाही कळंत की, आमच्या धंद्यात इमानदारीच सगळं काही असतं. लोक आपल्या मेहनतीचे पैसै घालवून आमच्याकडे तिकिट विकत घेतात. म्हणूनच त्यांचा विश्वास कधीही तुटता कामा नये.'' (Image Credit- Getty Images)