Birthday : 'स्व:कष्टातून विकसित झालेलं नेतृत्व देवेंद्र तर शिस्तशीर अन् वक्तशीर दादा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:24 AM2021-07-22T11:24:31+5:302021-07-22T11:44:17+5:30

विषेश म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोघांमधील चांगले गुण आणि कर्तव्यनिष्ठा समजावून सांगितली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे दोन्ही नेते महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळालं. एकेकाळचे कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांनी हातात हात घालून भाजपाला सत्तेतून दूर फेकले.

या सत्तासंघर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वच नेत्यांनी सर्वांची भंबेरी उडवून टाकली होती. पहाटे ५ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सरकार स्थापन करून शपथविधी सोहळा पार पाडला होता.

या दोघांचे सरकार ८० तास चालले परंतु आजही या दोन्ही नेत्यांचं वर्चस्व कमी झाले नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात एक योगायोग कायम असेल आणि यापुढेही राहील.

तो म्हणजे दोन्ही नेत्यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी असतो. सध्या कोरोना काळ असल्याने दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करता, अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचा संदेश देऊन दोन्ही नेत्यांनी सामाजिक भान जोपासलं आहे.

विषेश म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोघांमधील चांगले गुण आणि कर्तव्यनिष्ठा समजावून सांगितली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे 62 वर्षे पूर्ण करत असून त्यांनी मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य चिंततो, वेळेची आणि कामाची दोन्हीची शिस्त अतिशय पक्की असल्याने दादा कर्तव्यकठोर व्यक्तीमत्व म्हणून अनेकांना भासतात.

बोलायला लागले की त्यांच्यातील विनोदबुद्धही अनुभवता येते. म्हणूनच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप समाजमनावर सोडली आहे, असे कौतुकास्पद उद्गार काढत अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, अजित दादा म्हणजे एक शिस्तशीर व वक्तीशीर व्यक्तिमत्व असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयुष्याचे 51 वे वर्षे साजरे करत आहेत. देवेंद्रजी कायदेतज्ज्ञ आहेत, अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची जाण असेलले नेते आहेत. उच्चविद्याविभूषित, परदेशात शिकून आलेल्या मोजक्या राजकारण्यांपैकी ते एक आहेत, असे गौरवोद्गार अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काढले आहेत.

तसेच, देवेंद्र यांना राजकीय वारसा असला तरी त्यांचे नेृतत्व स्वकष्टातून आणि परिश्रमाने विकसित झाले आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.