काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 13:33 IST2019-07-30T13:26:49+5:302019-07-30T13:33:35+5:30

अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी राजीनामा दिला. अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पिचड करतात
सातारा-जावळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे हेदेखील भाजपात प्रवेश करणार आहेत.
संदीप नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. संदीप नाईक, गणेश नाईक हे संपूर्ण कुटुंब भाजपात प्रवेश करणार आहे. मात्र नाईक यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपा आमदार मंदा म्हात्रे नाराज झाल्या आहेत.
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे कालीदास कोळंबकर हे काँग्रेसचे बंडखोर आमदार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते काँग्रेसमध्ये नाराज होते.
राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात ते गृहनिर्माण मंत्री आहेत.