Ganesh Chaturthi 2018: 'Ganapati Ghar Gharat - Ganpati Namatnam'
Ganesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात' By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 08:22 PM2018-09-13T20:22:06+5:302018-09-13T20:33:10+5:30Join usJoin usNext देशभरात आज गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, गणेश भक्तांकडून लाडक्या बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली. केवळ मंडळाचेच नाही, तर घरात 10 दिवस मुक्काम करणाऱ्या गणरायाचेही बाप्पा मोरयाच्या जयघोषात आगमन झाले सँड आर्टीस्टने वाळूचा बाप्पा साकारून प्लॅस्टीकमुक्त आणि प्रदुषण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे गणेशोत्सवाचा आनंद हा सगळीकडे सारखाच असतो, राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीतही बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सारखाच असतो हेच या फोटोतून दिसून येते. गणरायाचे थाटामाटात आगमन झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती घरात विराजमान करण्यात आली. तर गणरायाच्या आरासासाठी सजावटही करण्यात आली आहे. कुणी वाजत गाजत रस्त्याने, कुणी दुचाकीवरुन तर कुणी चारचाकीतून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले गणरायाच्या आगमनाचा आनंद हा चिमुकल्यांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे, गणपती बाप्पा मोरया.... परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते, गणरायाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करताना काय बरं मागत असेल ही चिमुकली बाप्पाकडे टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवGanesh Chaturthi 2018Ganpati Festival