गुलाल आमचाच.... ग्रामपंचायत निवडणूक निकालाची क्षणचित्रे By महेश गलांडे | Published: January 18, 2021 04:02 PM 2021-01-18T16:02:42+5:30 2021-01-18T16:18:15+5:30
राज्यातील 15,242 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निकाली निघाल्या आहेत
आता, उर्वरीत ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला सकाळी 8.30 वाजल्यापासून सुरुवात झाली होती.
गावागावात उमेदवारांची आणि गावकऱ्यांची उत्कंठा वाढली असून विजयी सेलिब्रेशनसाठी गावकरी सकाळपासूनच सज्ज झाले होते.
अनेक जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने मिरवणूक, विजयाचे सेलिब्रेशन, रॅली आणि सार्वजनिक संभांना बंदी घातली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात गावागावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
विजयी मिरवणुकांना परवानगी देण्यात आली नसली, तरी गुलालाची उधळण करुन गावागावात उमेदवारांनी जल्लोष केलाय.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाईचा मोठा उत्साह दिसून आला, तरुणाईने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच इंटरेस्ट घेतल्याचं दिसलं
आपल्या आघाडीचा निकाल ऐकताच आणि आपला उमेदवार निवडून आल्याचे समजताच कार्यकर्ते जल्लोष करताना दिसले.
मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, तर बाहेर गावकऱ्यांची आणि मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत, काही दिग्गज नेत्यांनाही त्यांच्या गावातील ग्रामपंचायत राखता आली नाही.
लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण निकालाच्या दिवसाची उत्कंठापूर्वक वाट पाहात होते. गावोगावी गुलालाचे पोते आणि हारांच्या माळा तयार होत्या
मतमोजणी केंद्राबाहेर अक्षरशा जत्रेचं स्वरुप पाहायला मिळालं. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे सांगण्यात आले होते. तरीही नागरिकांची मोठी गर्दी होती.
भाजपा-शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांचे नेते विजय आमचाच आणि गुलाल आम्हीच उधळल्याचे ठणकावून सांगत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भदोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांनी विजय मिळवला आहे.