NCP Sharad Pawar's loyal big leader will join Ajit pawar Group?
शरद पवारांचा विश्वासू मोठा नेता अजितदादांच्या गळाला?; राजकीय चर्चांना उधाण By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:30 PM2023-08-05T14:30:40+5:302023-08-05T14:35:17+5:30Join usJoin usNext राज्याच्या राजकारणात अनेकदा अशा घडामोडी घडतायेत ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. २०१९ नंतर राज्यात २ सरकार कोसळले, सुरुवातीला अजित पवार-देवेंद्र फडणवीस त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार. शिवसेनेत गेल्या वर्षी फूट पडल्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादीतही तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अजित पवार यांनी थोरल्या पवारांच्या भूमिकेपासून फारकत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर त्याच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यासारख्य दिग्गज नेत्यांचा सहभाग होता. आता पुन्हा शरद पवार गटातील एक मोठा नेता अजित पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच हा नेता अजित पवारांच्या गटात सहभागी होईल. मविआ काळात मंत्री असलेल्या या नेत्याला पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीतील हा बडा नेता शरद पवारांच्या अगदी जवळचा मानला जातो. महाविकास आघाडीत या नेत्याला मंत्री बनवण्यात आले होते. शरद पवार गटात एकाकी पडल्याची भावना या नेत्याच्या मनात आहे. त्यामुळे लवकरच ते अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने एबीपीने दिलीय. अजित पवारांसह इतर राष्ट्रवादी नेत्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवार गटातील इतर नेत्यांना आपल्याला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अनेक नेते अजित पवारांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. सध्याच्या घडीला अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यासारखी दिग्गज मंडळी शरद पवारांसोबत कायम आहेत. यातील काही नेत्यांशी अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडून जे प्रयत्न सुरू होते त्यात यातील एक मोठा नेता लवकरच अजित पवार गटाला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होईल. या नेत्याला राज्य सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जातेय. विशेष म्हणजे या नेत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कल्पना दिली आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश लवकर होईल. एकीकडे शरद पवारांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम केले जातेय तर दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेला नेता अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर प्रकृती अस्वस्थ कारणाने राज्याचा दौरा होऊ शकला नाही. त्यात बंगळुरूच्या विरोधकांच्या बैठकीत पवार दुसऱ्यादिवशी हजर झाले होते. एकंदर आगामी भविष्यात आपण एकाकी पडू नये अशी भावना या नेत्याच्या मनात आहे त्यामुळे अजितदादांसोबत जाण्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना कळवल्याची माहिती पुढे आली आहे. टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारSharad PawarNCPAjit Pawar