'There should be a university in Savarkar's name, demands Sanjay Raut' MMG
'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी' By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:40 PM2020-05-28T22:40:59+5:302020-05-28T22:49:59+5:30Join usJoin usNext स्वातंत्र्यवीर सावकरांची आज जयंती होती, त्यानिमित्त राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली खासदार संजय राऊत यांनी सावकर यांचा फोटो शेअर करत, सावकरांच्या नावे विद्यापीठ असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या मातोश्री निवासस्थानी सावरकर यांची जयंती साजरी केली देवेंद्र फडणवीस यांनीही सावरकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत सावरकर यांना आदरांजली अर्पण केली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली होती. शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सावरकरांचा सन्मान व्हायलाच हवा, त्याच्याशी कधीही तडजोड होऊ शकत नाही, अशा शब्दांत राहुल यांचे कान टोचले आहेत. आम्हाला स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे' असे ट्विट करत राऊत यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेसच्या या पवित्र्यानंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टार्गेट करत, महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. वीर सावरकर हे खरे भारत रत्न!पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी. इंग्रज सरकारने सावरकरांची पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे. विद्यापीठ असावे.केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे. वीर सावरकरांना विनम्र अभिवादन!, असे राऊत यांनी म्हटले आहे. टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरेकाँग्रेसनरेंद्र मोदीSanjay RautUddhav ThackeraycongressNarendra Modi