Biography of pranab mukherjee
राज्यसभा ते राष्ट्रपती, हुकले फक्त पंतप्रधानपद; धुरंधर राजकारण्याचा प्रदीर्घ प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:18 PM2020-08-31T20:18:37+5:302020-08-31T20:54:10+5:30Join usJoin usNext प्रणव मुखर्जी, भारताचे 13वे राष्ट्रपती. काँग्रेसचे आणि देशाचे दिग्गज नेते असलेले प्रणवदा 2012 ते 2017 या काळात राष्ट्रपती पदावर विराजमान होते. यापूर्वी, ते सहा दशकं भारतीय राजकारणात सक्रिय होते. त्यांना काँग्रेसचे संकटमोचकदेखील म्हटले जाई. 2019मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारत रत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. प्रणवदा हे 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सर्वप्रथम राज्यसभेवर निवडून गेले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पंतप्रधनपद सोडले, तर त्यांनी अनेक मोठी पदे भूषवली. राजकारणातील अनेक गाढ्या अभ्यासकांनी तर अशीही मते माडली आहेत, की मनमोहन सिंगांच्या जागी प्रणवदा हे एक अत्यंत चांगले पंतप्रधान सिद्ध झाले असते. प्रणवदा इंदिरा गांधी यांच्या विश्वासातील मंडळींपैकी एक होते. वादग्रस्त आणीबाणीच्या काळात ते वाईट पद्धतीने वागल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. मात्र नंतर, ते पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. पण काँग्रेसमधील धुरिणांनी राजीव गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. (Photo - HT) यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष काढला. त्याचं नाव, 'राष्ट्रीय समाजवादी कांग्रेस'. मात्र, राजीव गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पीव्ही नरसिंहराव यांनी प्रणवदांना नियोजन आयोगाचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवाण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. ते देशाचे परराष्ट्रमंत्रीही होते. काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएची निर्मिती झाली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जांगीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकली. तेव्हापासून ते राष्ट्रपती होईपर्यंत प्रणवमुखर्जी हे मनमोहन सिंगांनंतर सरकारमधील दुसरे सर्वात मोठे नेते राहिले. त्यांनी संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री आणि लोकसभा पक्ष नेते, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. जुलै 2012च्या निवडणुकीत पीए संगमा यांचा सहज पराभव करत प्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. मुखर्जी यांचा जन्म बीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात 11 डिसेंबर, 1935ला झाला होता. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होते. ते 1952 ते 1964 दरम्यान बंगाल विधान परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी होते. त्यांच्या आईचे नाव राजलक्ष्मी मुखर्जी, असे होते. प्रणव मुखर्जी यांचे शिक्षण बीरभूम येथील सुरी विद्यासागर महाविद्यालयात झाले. हे महाविद्यालय तेव्हा कोलकाता विद्यापीठाशी संलग्न होते. त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहासात पदव्योत्तर पदवी मिळवली होती. एवढेच नाही, तर त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली होती. 13 जुलै 1957 रोजी त्यांचा विवाह सुभ्रा मुखर्जी यांच्याशी झाला होता. मिडटर्म पोल, बियाँड सरव्हायवल, इमर्जिंग डायमेंशन्स ऑफ इंडियन इकोनॉमी, ऑफ द ट्रॅक - सागा ऑफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस तसेच चॅलेन्ज बिफोर द नेशन, ही पुस्तकेही प्रणव मुखर्जी यांनी लिहिली आहेत. मुखर्जी दुर्गा पूजेचा उत्सव दरवर्षी आल्या मुळ गावी म्हणजेच मिरती येथेच साजरा करत. अर्थमंत्री पदावर असताना त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. (Photo - PTI) भारत सरकारने त्यांना पद्म विभूषणदेऊनही सन्मानित केले होते. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याशिवाय बूल्वरहॅम्पटन आणि आसाम विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देऊनही सन्मानित केले होते. भारतरत्न प्रणव मुखर्जी.टॅग्स :प्रणव मुखर्जीकाँग्रेसराष्ट्राध्यक्षभारतराजकारणPranab MukherjeecongressPresidentIndiaPolitics