Congress and JD(S) move their MLAs in Eagleton Golf Resort Bengaluru Resort
हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम' By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:56 AM2018-05-17T10:56:48+5:302018-05-17T10:56:48+5:30Join usJoin usNext कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाकडून विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बहुमताच्या आकड्यासाठी 8 आमदार कमी पडत असल्याने भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाण्याची शक्यता आहे. आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेस व जनता दलाने सुरक्षिततेसाठी आपापल्या आमदारांना बंगळुरूतील ईगल्टन रिसॉर्ट व शांगरिला हॉटेलमध्ये ठेवले आहे. ईगल्टन रिसॉर्ट हे बंगळुरू-मैसूर रस्त्यावर स्थित आहे. ईगल्टन रिसॉर्ट हे काँग्रेसचे नेते डी.के.सिवाकुमार यांच्या मालकीचे आहे. यापूर्वी गुजरात राज्यसभा निवडणुकीच्यावेळीही काँग्रेसच्या आमदारांना या रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते. जनता दलानेही (सेक्युलर) आपल्या पक्षाच्या आमदारांना बंगळुरूच्या शांगरिला हॉटेलमध्ये हलवले आहे. भाजपाकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी असल्याने या काळात आमदारांच्या फोडाफोडीचे सत्र सुरू राहण्याचा अंदाज आहे.टॅग्स :कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८भाजपाकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018BJPcongress