crorepati leaders who pay Income tax through government money
करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:01 PM2019-09-19T13:01:42+5:302019-09-19T13:14:06+5:30Join usJoin usNext अनेक राज्यांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत की करोडपती असलेले आमदार आणि मंत्री आयकर भरण्यासाठी सक्षम नाहीत. यामुळे त्यांनी सरकारी खजिन्यातूनच त्यांचा आयकर भरण्याची क्लुप्ती शोधून काढली आहे. यामध्ये साधेसुधे नेतेच नाहीत तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या मोठमोठ्या राज्यांचे मुख्यमंत्र्यांचाही सहभाग आहे. मात्र, पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी 2018 मध्ये ही प्रथा बंद केली होती. आता उत्तर प्रदेश सरकारने मंत्री, आमदारांना त्यांचा कर त्यांनीच भरण्याचे आदेश दिले आहेत. पाहुयात कोणत्या नेत्यांचा आयकर सरकारी तिजोरीतून भरला जातो. शिवराज सिंह चौहान शिवराज सिंह चौहान सध्या मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आहेत. ते 15 वर्षे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. 2006 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1 कोटींची संपत्ती दाखविली होती. जी 2013 मध्ये वाढून 6 कोटी झाली होती. तरिही त्यांचा आयकर भरण्यासाठी सरकारी पैशांचाच वापर होत आहे. कमलनाथ कमलनाथ हे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. 2018 च्या निवडणुकीत त्यांनी एकूण संपत्ती 206 कोटींपेक्षा जास्त दाखविली होती. मुख्यमंत्री असल्याने त्यांचा कर जनतेच्या पैशांतून भरला जातो. रमन सिंह डॉ. रमन सिंह हे छत्तीसगडचे भाजपाचे मुख्यमंत्री होते. त्यांची संपत्ती 5 कोटी आहे. त्याचा आयकरही सरकारी तिजोरीतून भरला जातो. भूपेश बघेल छत्तीसगड विधानसभेत मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री बनलेले भूपेश बघेल यांनी त्यांची संपत्ती 23 कोटी सांगितली होती. तरीही ते स्वत: टॅक्स भरण्यासाठी सक्षम नाहीत. वीरभद्र सिंह काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंह हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांती संपत्ती 33 कोटी लिहिली होती. त्यांचाही कर सरकारी पैशांतून भरला जातो. जयराम ठाकूर 2017 मध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले भाजपाचे नेते जयराम ठाकूर यांची संपत्ती 3 कोटी रुपये आहे. करोडपती असूनही त्याचा आयकर सरकारी पैशांनी भरला जातो. हरीश रावत काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते विधानसभा निवडणुकीत जिंकू शकले नाहीत. 2014 मध्ये त्यांनी संपत्ती 6 कोटी रुपये सांगितली होती. त्रिवेंद्र सिंह रावत हरीश रावत यांनी सत्ता गमावल्याने भाजपाने त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनविले. त्यांनी 2017 मध्ये संपत्ती 1 कोटी दाखविली होती. भूपेंद्र सिंह हुड्डा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी 2014 मध्ये संपत्ती तीन कोटी सांगितली होती. आता ते हरियाणाचे विरोधी पक्षाचे नेते आहेत. मनोहर लाल खट्टर भाजपाने 2014 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केले होते. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची एकूण संपत्ती 61 लाख रुपये होती. मात्र, ते ही सरकारी पैशांचा वापर कर भरण्यासाठी करतात. मायावती बसपाच्या सर्वेसर्वा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. 2004 मध्ये त्यांनी 11 कोटींची संपत्ती दाखविली होती. त्यांचा करही सरकारी पैशांतून भरला जात होता. अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव लोकसभा सदस्य आहेत. 2009 मध्ये त्यांनी 4 कोटी संपत्ती जाहीर केली होती. ते मुख्यमंत्री असताना राज्याच्या मंत्र्याचा, आमदारांचा आयकर सरकारी खजिन्यातून भरण्यात आला. योगी आदित्यनाथ गोरक्ष पीठाचे महंत ते मुख्यमंत्री बनलेल्या आदित्यनाथ यांचीही संपत्ती कोटीच्या घरात आहे. 20014 मध्ये त्यांनी संपत्ती 71 लाख रुपये दाखविली होती. आता त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मंत्री, आमदारांनी त्यांच्या पैशांतूनच आयकर भरण्याचे आदेश दिले आहेत. प्रकाश सिंग बादल अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी 2012 मध्ये संपत्ती 6 कोटी दाखविली होती. मात्र, आयकर सरकारी पैशांतून भरत आहेत.कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. मार्च 2018 मध्ये त्यांनी मंत्री आणि आमदारांचा आयकर सरकारी पैशांतून देण्याची प्रथाच बंद केली. 2017 मध्ये त्यांनी संपत्ती 48 कोटी दाखविली होती.टॅग्स :इन्कम टॅक्सयोगी आदित्यनाथशिवराज सिंह चौहानमायावतीअखिलेश यादवभाजपाकाँग्रेसIncome Taxyogi adityanathshivraj singh chauhanmayawatiAkhilesh YadavBJPcongress