पाणी वाचविण्यासाठी 'या' गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:59 PM2019-06-13T13:59:53+5:302019-06-13T14:03:11+5:30

सध्या देशात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी लोकांचा पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल गावातील गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे त्याची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.

या गावात पाणीटंचाई इतकी भयंकर आहे की, लोकांनी आंघोळ करणं सोडून दिलं. पाच दिवसातून एकदा आंघोळ करण्यासाठी खाटीचा वापर केला जातो.

खाटीवर आंघोळ करुन खाटीखाली ठेवलेल्या टपात पाणी जमा केले जाते. आणि टपातील पाण्याचा पुन्हा वापर केला जातो. मात्र यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पाणी वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी ही शक्कल लढवली मात्र आंघोळ केलेलं पाणी किचनसाठी पुन्हा वापरण्यात येते. भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.

750 लोकसंख्या असलेल्या या गावात 5 बोअरवेल आणि 5 विहिरी आहेत मात्र सगळ्याठिकाणी पाण्याची कमतरता आहे. पहाटे चारपासून लोक पाण्यासाठी रांगेत उभे राहतात. तसेच विहिरीतील पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.