Electrictiy: लाईटबिलाची नका करू चिंता, असं केल्यास वीजबील शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:54 PM2022-02-27T17:54:57+5:302022-02-27T18:08:36+5:30

रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे.

लाईट ही सध्या काळाजी गरज बनली आहे, लाईटशिवाय माणूस तासभरही राहू शकत नाही. त्यामुळेच, लाईट गेल्यास लाईट केव्हा येणार हा पहिला प्रश्न संबंधित विभागातील नागरिकांकडून विचारण्यात येतो.

लाईटसह लाईटबिल हेही सर्वसामान्यांच्या डोकेदुखीचं कारण बनत आहे. कारण, लाईट बिल अव्वाच्या सव्वा येत असल्याच्या अनेक तक्रारी दिसून येतात. विशेषत: कोविड काळात अशा अनेक तक्रारी आल्या.

नुकतेच पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही काही पक्षांनी ठराविक युनिटपर्यंत लाईट मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे. कारण, वाढत्या महागाईसोबत घरगुती वापरातील वीजेचे दरही वाढले आहेत.

मध्य प्रदेश सरकार घरगुती वीज बिलापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी योजना पुरवत आहे. या योजनेवर काम केल्यास निश्चितच लाईट बिलापासून तुम्हाला सुटका मिळेल.

घरात किती विजेचा वापर करा, फ्रीज, टीव्ही, ट्युबलाईट किंवा इतर उपकरणे वापरले तरीही तुम्हाला 1 रुपयाही बिल द्यावे लागणार नाही.

मध्य प्रदेशात अनेक नागरिकांनी या तांत्रिक वस्तूचा वापर करत आपल्या घरातील लाईटबिल शुन्यावर आणलं आहे. शहरात अनेक लोकं आहेत, ज्यांच्या घरात वीजेचं कनेक्शनच नाही.

घरगुती वापराच्या वीजबिलाची वाढती रक्कम लक्षात घेऊन या नागरिकांनी घरावर सौर उर्जा सयंत्र बसवले आहे. त्या माध्यमातून ते आता केवळ वीजेचं उत्पादन करत नाहीत, तर वीज कंपनीला वीजही विकत आहेत.

सौर ऊर्ज यंत्र बसविण्यासाठी काहींनी 1.5 लाख तर काहींनी 2 लाख रुपये खर्च केला आहे. आता, या ग्राहकांना दरमहा वीजबिलात सपशिडीही मिळत आहे.

रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे.

सौर ऊर्जा सयंत्रणाचा वापर केल्यास नक्कीच ग्राहकांना त्याचा फायदा होईल. वीजबिलापासून सुटका मिळेल, याशिवाय वर्षातून एकदा वीज कंपनीकडूनही विकण्यात आलेल्या वीजेची रक्कम मिळेल.