Gujarat Election 2022: भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, गुजरात कोण जिंकणार? फायनल ओपिनियन पोलमधून दिसला धक्कादायक कल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 09:35 AM 2022-11-29T09:35:43+5:30 2022-11-29T09:40:49+5:30
Gujarat Election 2022: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २७ वर्षे सत्तेवर असलेला भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस सत्तापरिवर्तनासाठी संघर्ष करत आहे. तर अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये चमत्कार करण्याची आस बाळगून आहे.
दरम्यान, गुजरातमधील मतदानाला काही दिवस उरले असताना काही वृत्तवाहिन्यांनी फायनल ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. एबीपी न्यूज-सी वोटरने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या ओपिनियन पोलनुसार १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला ४६ टक्के, काँग्रेसला २७ टक्के, आपला २१ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात.
तर जागांचा विचार केल्यास भाजपाला १८२ पैकी १३४ ते १४२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला २८ ते ३६ आणि आपला ७ ते १५ जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यामध्ये ० ते २ जागा जाऊ शकतात.
इंडिया टीव्ही-मॉटराईजनेही ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये एकूण १८२ जागांपैकी भाजपाला ११७ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ५९ आणि आपला ४ तर इतरांना २ जागा मिळू शकतात.