Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये कांटे की टक्कर, भाजपा जिंकणार, पण आप जोरदार मुसंडी मारणार, धक्कादायक ओपिनियन पोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 02:03 PM2022-11-04T14:03:15+5:302022-11-04T14:11:46+5:30

Gujarat opinion poll 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच विविध ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच विविध ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत.

दरम्यान, टाइम्स नाऊ-नवभारत आणि ईटीजीचं गुजरातबाबतचं ओपिनियन पोलसमोर आलं आहे. या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार बनेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र गुजरातमध्ये यावेळी आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारेल, असा दावा या ओपिनियन पोलमधून करण्यात आला आहे.

ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजपाला १२५ ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २९ ते ३३ जागा मिळू शकतात. तर आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारत २० ते २४ जागा जिंकेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. इतरांच्या खात्यामध्ये १ ते तीन जागा जातील.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाला सातत्याने मिळत असलेल्या विजयाचाही ओपिनियन पोलमधून आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार गुजरात मध्ये भाजपाला विकासाच्या मॉडेलवर ४५ टक्के मते मिळत आहेत. भक्कम पक्षसंघटनेमुळे १९ टक्के, तर गुजरातमधील कमकुवत विरोधी पक्षामुळे भाजपाला २७ टक्के मते मिळतील.

या ओपिनियन पोलनुसार प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागा पुढीलप्रमाणे आहेत. भाजपा १२५ ते १३०, काँग्रेस २५ ते ३३, आप २० ते २४.

गुजरातमध्ये कुठल्या पक्षाला मिळतील किती टक्के मते. भाजपा ४५ टक्के, काँग्रेस २१ टक्के, आप २९ टक्के, इतर ५ टक्के.