..तेव्हा २ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:30 PM 2024-08-26T14:30:42+5:30 2024-08-26T14:33:57+5:30
माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. जेव्हाही गांधी कुटुंबातील राजकारणाचा उल्लेख होतो तेव्हा मेनका गांधी यांचं नाव सोनिया गांधी यांच्याआधी येते. मेनका गांधी यांनी सोनिया गांधींच्या आधीच राजकारणात पाऊल ठेवले होते. मेनका गांधी या एक मॉडेल आणि पत्रकारही राहिल्या आहेत.
राजकारणात मेनका गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकारणाचा वारसा सांभाळला नाही. नवी दिल्लीतील शिख कुटुंबात मेनका गांधींचा जन्म झाला. कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक फॅशन शोमध्ये भाग घेतला. कॉलेजनंतर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं.
मेनका मॉडेलिंग करत होत्या तेव्हा त्यांचा फोटो इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी यांना पाहिला. पहिल्या भेटीत ते प्रेमात पडले. १९७४ साली जुलैमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला त्यानंतर २ महिन्यांनी २३ सप्टेंबर १९७४ ला ते लग्नाच्या बंधनात अडकले. या दोघांच्या लग्नानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली होती.