ज्योतिरादित्य शिंदेंनी बदला घेतलेला! दिग्विजय पलटवारासाठी १४ वर्षे वाटच पाहत होते, अखेर... By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:11 PM 2023-04-18T20:11:56+5:30 2023-04-18T20:24:33+5:30
२००६ मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशी चाल खेळली की दिग्विजय सिंह यांना राज्याच्या राजकारणापासून दूर राहावे लागले होते. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कोणता नेता कधी कोणाचा बदला घेईल तेही सांगता येत नाही. राजकारण म्हणजचे डोक लोवून खेळला जाणार खेळच आहे. यात कधी कोणाचा पराभव तर कधी कोण जिंकेल सांगता येत नाही. आता आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहे. हा किस्सा २००६ चा आहे. तब्बल १४ वर्षानंतर एका नेत्याने दुसऱ्या नेत्याचा हिशोब चुक्ता केला आहे.
हा किस्सा आहे त्यावेळच्या काँग्रेसमधील दोन दिग्गच नेत्यांचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांच्या काळापासून हे वैर सुरू आहे. हे राजकीय शत्रुत्वापेक्षा शाही शत्रुत्व जास्त आहे कारण राघोगड हे ग्वाल्हेर संस्थानाच्या राजवटीत होते. १९९३ मध्ये जेव्हा दिग्विजय सिंह पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा माधवराव शिंदे हे देखील या पदाच्या दावेदारांमध्ये होते. अर्जुन सिंह यांच्या पाठिंब्याने दिग्विजय सिंह मुख्यमंत्री झाले होते.
२००२ मध्ये ज्योतिरादित्य सिंह यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतरही शत्रुत्वाची ही मालिका सुरूच होती. पक्षात असूनही दोघांनी एकमेकांना कमकुवत करण्याची एकही संधी सोडली नाही. अशीच एक घटना २००६ मध्ये पाहायला मिळाली होती जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे दिग्विजय सिंह यांना खासदारकीपासून दूर राहावे लागले होते.
खरे तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय प्रवेशाच्यावेळी दिग्विजय सिंह यांनी त्यांना पक्षाच्या हायकमांडच्या सांगण्यावरून मदत केली होती, पण हे जास्त दिवस चालले नाही. २००३ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी राज्यभर दौरा केला आणि पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली.
शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात एक करार होता की दोघे एकमेकांच्या हद्दीत जाणार नाहीत. २००६ च्या सुमारास दिग्विजय सिंह यांनी शिंदेविरोधात उघडपणे वक्तव्ये करण्यास सुरुवात केली होती. विधानाने ज्योतिरादित्य शिंदे नाराज झाले आणि त्यांनी हा अघोषित करार मोडला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिग्विजय सिंह यांच्या बालेकिल्ल्यात आरोनमध्ये किसान संमेलनाच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन केले.
त्यामुळे दिग्विजय सिंह ही शिंदे यांचा बालेकिल्ला मुरैनीत गेले. तिथे त्यांनी रॅली काढली. यानंतर श्योपूर आणि चंबळमध्येही अनेक ठिकाणी दिग्विजय सिंह यांच्या सभा झाल्या. दिग्विजय सिंह यांचे शिंदे यांच्याशी असलेले वैर आता चव्हाट्यावर आले होते, पण नंतर असे काही घडले की दिग्विजय सिंह यांचे मन दुखावले.
त्याकाळी काँग्रेस नेत्यांचे शक्तिप्रदर्शन सामान्य झाले होते. ठिकठिकाणी ते मोठमोठे मोर्चे, सभा घ्यायचे, पण शक्तीप्रदर्शन करताना त्यांना खरा शत्रू भाजप आहे हे विसरले. बहुतेक प्रसंगी त्यांचे लक्ष्य त्यांच्याच पक्षाचे प्रतिस्पर्धी होते.
दिग्विजय सिंह यांनी संपूर्ण राज्यात रॅली काढण्याची घोषणा केली तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुभाष यादव पक्षाच्या हायकमांडपर्यंत पोहोचले. दिग्विजय सिंह यांच्या सभांमुळे पक्ष कमकुवत होत असल्याचे पक्ष नेतृत्वाला पटवून देण्यात दोघेही यशस्वी झाले. हायकमांडने दिग्विजय सिंह यांना रॅली न घेण्याचे निर्देश दिले. दिग्विजय सिंह यांना घरी बसावे लागले. इतकेच नाही तर यानंतर ते बराच काळ राज्याच्या राजकारणापासून दूर राहिले.
तेव्हा दिग्विजय सिंह नाराज झाले होते. पण त्यांनी नाराजी बोलून दाखवली नाही. ते संधीची वाट पाहत होते. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांना ही संधी मिळाली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्योतिरादित्य सिंधिया आघाडीवर होते, पण दिग्विजय सिंह यांच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या.
कमलनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पडद्यामागे अशी खेळी केली की शेवटी ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेस सोडावी लागली. एकेकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे दिग्विजय सिंह यांना राज्याच्या राजकारणापासून दूर राहावे लागले होते. १४ वर्षांनंतर त्यांनी असा बदला घेतला की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ज्या पक्षातून राजकीय प्रवास सुरू केला तो पक्षच सोडावा लागला.