उत्तर भारतात लोहडीचा सण उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 23:00 IST2019-01-13T22:49:42+5:302019-01-13T23:00:10+5:30

लोहडीचा सण आज संपूर्ण उत्तर भारतात उत्साहात साजरा करण्यात आला. लोहडी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो.

लोहडीनिमित्त लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि रेवड्या एकत्र करून शेकोटी पेटवली जाते. तसेच त्याभोवती फेर धरला जातो.

मध्य प्रदेश - राजधानी भोपाळ येथे लोहडीनिमित्त नृत्य करणाऱ्या महिला.

छत्तीसगड - छत्तीसगडमधील रायपूर येथेही लोहडीचा सण उत्साहात साजरा झाला.

पंजाब - अमृतसर येथे लोहडी सण साजरा करण्यासाठी जमलेले नागरिक.

दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतही लोहडीचा सण उत्साहात साजरा झाला.