Navratri 2021: इथे विराजमान होते महाकाली, भाविकांची श्रद्धा अशी की, मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी झालंय २०५६ पर्यंतचं अॅडव्हान्स बुकिंग By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:09 AM 2021-10-12T11:09:04+5:30 2021-10-12T11:18:11+5:30
Navratri 2021: जबलपूरच्या रांझी येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मन्नत महाकालीची प्रतिष्ठापना होते. या देवीची ख्याती एवढी आहे की, येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी २०५६ पर्यंतचं अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. जबलपूरच्या रांझी येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मन्नत महाकालीची प्रतिष्ठापना होते. या देवीची ख्याती एवढी आहे की, येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी २०५६ पर्यंतचं अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे.
शारदिय नवारत्रीमध्ये जबलपूरमध्ये संस्कारधानी येथे मंडपातमध्ये जागोजागी देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या गेल्या आहेत. श्रद्धेचे विशिष्ट्य अधिष्ठान असलेल्या मनोकामना महाकालीची दरवर्षी शारदिय नवरात्रीमध्ये विधिवत प्रतिष्ठापना होते. गेल्या २५ वर्षांपासून येथे महाकालीची प्रतिष्ठापना केली जात आहे.
या देवीवर भाविकांची एवढी श्रद्धा आहे की, येथे २०५६ पर्यंत मूर्तीच्या स्थापनेच्या खर्चासाठीचं अॅडव्हान्स बुकिंग भक्तमंडळींनी केलेलं आहे. मात्र त्यांना संधी मिळत नाही आहे. ज्या भक्तांची इच्छा देवीने पूर्ण केली आहे अशा भक्तांचा यामध्ये समावेश आहे.
येथील माता महाकाली देवीला मनोकामना महाकाली हे नाव कुणी दिलेले नाही. तर ते देवीच्या भक्तांनीच प्रचलित केले आहे. या नावामागे अनेक चमक्तारिक घटना घडलेल्या आहेत. येथे जो कुणी भक्त आला आणि त्याने मागणे मागितले, त्याची मनोकामना देवीने पूर्ण केली. हा क्रम अखंडितपणे सुरू राहिला.
दरवर्षी जबलपूरमधील रांझी क्षेत्रामध्ये देवीची मोठी मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. तसेच येथे पुढील नऊ दिवस पूजा पाठ सुरू असतो. मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी २०३८ पर्यंतचे बुकिंग करण्यात आले आहे. तर भक्तांनी एवढी रक्कम जमा केली आहे की २०५६ पर्यंत मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी वेटिंग सुरू आहे.
देवीला दरवर्षी सोन्या-चांदीचे दागदागिने अर्पण केले जातात. त्यानंतर नवमीच्या भंडाऱ्यावेळी हे दागिने गरीब मुलींना दिले जातात. तसेच येथे दानाच्या माध्यमातून जी रक्कम जमते त्यामधून गरीब मुलींचे विवाह केले जातात. समितीचे महंत सांगतात की, ही परंपरा १९९७ पासून सुरू आहे. तेव्हा काही मूलांनी मिळून देवीची मूर्ती तयार केली होती.