'Onam' festival
'ओणम' सणाचा उत्साह By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 01:19 PM2019-09-11T13:19:07+5:302019-09-11T13:30:06+5:30Join usJoin usNext दक्षिण भारतामधील केरळमध्ये ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केरळमध्ये या दिवशी सजलेले हत्ती, छोट्या-मोठ्या बोटी, संगीत, पारंपरिक लोकनृत्य व वेगवगेळ्या कलेच्या सादरीकरणात हा सण पार पडतो. केरळ वासियांसाठी ओणम हा महत्वपूर्ण पर्व असून याची धूम देशातील सर्व कानाकोपऱ्यात दिसून येते. सणादरम्यान मंदिरासह घरात पारंपारिक मान्यतानुसार पूजापाठ केला जातो. ओणम या सणामध्ये स्नेक बोटींची शर्यत म्हणजेच 'अर्नामुल्ला वल्लामकली'चे मोठे वैशिष्टय आहे. 'पुक्कलम्' म्हणजेच फुलांनी काढलेली रांगोळी हेही या सणाचे एक खास आकर्षण मानले जाते. रंगीत अशा सुवासिक फुलांनी सजवलेली ही रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ओणम सणाची परंपरा ही जुन्या काळापासून चालत आली आहे. या सणावेळी घरात लज्जतदार पदार्थ बनवले जातात. तसेच, यावेळी केळीच्या पानात जेवण वाढले जाते.टॅग्स :केरळKerala