प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना

By मोरेश्वर येरम | Published: February 11, 2021 04:04 PM2021-02-11T16:04:40+5:302021-02-11T16:26:39+5:30

priyanka gandhi takes holy dip in ganga river : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गंगा नदीत स्नान करुन देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (priyanka gandhi vadra) यांनी गुरुवारी गंगा नदीत (Ganga River) स्नान केले.

मौनी अमावस्येच्या पवित्र क्षणाचं औचित्यसाधून प्रियांका यांनी गंगा नदीत डुबकी घेत सूर्याला अर्घ्य अर्पण केले.

काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर प्रियांकांच्या गंगा स्नानाचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

प्रियांका यांनी यावेळी देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

शास्त्रानुसार माघ महिन्यात जी अमावस्या असते तिला मौनी अमावस्या म्हंटले जाते. या दिवशी मौनव्रत ठेवल्याने व तोंडातून कडू शब्द न उच्चारल्याने मुनि पदाची प्राप्ती होते, असं म्हटलं जातं.

मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करणे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी असते. त्यामुळे या दिवशी गंगा नदीच्या काठावर हजारो भाविकांची गर्दी होते.