मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींची एन्ट्री, गंगा यात्रेला झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:01 PM2019-03-18T16:01:25+5:302019-03-18T16:18:20+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे

प्रियंका गांधी यांच्याकडून प्रयागराज येथील हनुमान मंदिरात जाऊन पूजा आणि आरती केली. या यात्रेची सुरुवात करण्यासाठी रविवारी संध्याकाळीच प्रियंका गांधी प्रयागराजमध्ये पोहचल्या होत्या.

हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं.

सुरक्षेचे कवच भेदत प्रियंका गांधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन संवाद साधत होत्या. याआधीही त्यांनी प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये रॅली काढली आहे.

त्यानंतर बोटीमध्ये बसून प्रियंका गांधी पुढील यात्रेसाठी निघाल्या. प्रयागराजवरुन निघालेल्या या यात्रेमध्ये गंगा किनाऱ्यांवरील गावांमध्येही जाऊन त्याठिकाणी स्थानिक लोकांशी संवाद साधणार आहे. गरिब आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत

प्रयागराज ते काशी दरम्यान गंगा नदीची अस्वच्छता यावर प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करतील. या यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना राजीव गांधी यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.