So 'water' breaks in schools, the beautiful fantasy of Kerala
स्कुल चले हम... शाळेतील 'वॉटर ब्रेक'ची होतेय 'सोशल चर्चा' By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:42 PM2019-11-18T14:42:45+5:302019-11-18T14:45:59+5:30Join usJoin usNext देशातील काही शाळांनी आपल्या कार्यकुशलेतून आणि हटके अंदाजातून आपली वेगळी ओळख बनवली आहे. तर, या शाळा इतर शाळांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. आपल्या शाळेत मुलांना पाणी पिण्याची चांगली सवय लावण्याचा उपक्रम एका शाळेनं सुरू केलाय. केरळमधील या शाळेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरुय. केरळच्या धर्तीवर कर्नाटक सरकारनेही शाळांमधील मुलांना ही सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. केरळमधील शाळांमध्ये शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी घंटा वाजवून सूचना केली जाते. वॉटर ब्रेकच्या नावानं ही संकल्पन सत्यात उतरली आहे. शाळेच्या वेळात एक दिवसात तीन वेळा ही वॉटर बेल वाजवून पाणी पिण्यास बजावले जाते. कमी पाणी पिल्याने उद्भवणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. केरळ कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील काही शाळांमध्येही या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. टॅग्स :शाळापाणीकेरळकर्नाटकSchoolWaterKeralaKarnatak