Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:58 AM2024-11-27T11:58:55+5:302024-11-27T12:03:34+5:30

Sonia Meena IAS MP: आयएएस अधिकारी सोनिया मीणा यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. वाळू माफियांविरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली असून, अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहिलेल्या मीणा यांना दबंग अधिकारी म्हटले जात आहे.

सोनिया मीणा हे नाव सध्या मध्य प्रदेशातील प्रशासकीय वर्तुळात आणि राज्यात चर्चेत आहे. आयएएस सोनिया मीणा या सध्या मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

२०१३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सोनिया मीणा या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शासकीय सेवेत आहेत.

कुटुंबातील लोक शासकीय सेवेत असल्यानेच सोनिया मीणा यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची आवड निर्माण झाली.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सोनिया मीणा यांना मध्य प्रदेश केडर मिळाले. राजगढमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती त्यांना मिळाली. त्यानंतर उमरिया आणि मुरैना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

अनुपपूर या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी झाल्यानंतर सोनिया मीणा त्या चर्चेत आल्या.

२०१७ मध्ये छतरपूर जिल्ह्यात वाळू माफियाशी आयएएस सोनिया मीणा यांचा सामना झाला. उत्खनन भागात त्या नियमित दौरे करायच्या. एकदा अवैधपणे वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर त्यांनी पकडला. ट्रॅक्टर चालक सोनिया मीणा यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालायला लागला.

त्यानंतर सोनिया मीणा यांनी कडक कारवाई केली. त्या चालकाला अटक केली. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांची नियुक्ती झाली.

अनुपपूरमध्ये जिल्हाधिकारी असताना त्यांनी कोळसा खाणीतील उत्खनन नियोजन आणि कोल इंडिया यांच्या समन्वय घडवून आणण्याचं आव्हानात्मक काम केलं. त्यावेळी त्यांना कोळसा माफियांचाही सामना करावा लागला.

याच काळात त्यांनी आदिवासींच्या जमिनीचा मुद्दा, अतिक्रमण, माफियांकडून होणार अवैध उत्खनन या गोष्टींवर काम केले. जास्त वाळू घेऊन जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. वाहने जप्त केली. इतकंच नाही, बोटीही जप्त केल्या.

वाळू माफियांविरोधात अभियान रावबत त्यांनी दुप्पट दंड वसूल केले. अनुपपूरमध्ये कार्यरत असताना सोनिया मीणा यांनी हडप केलेल्या जमिनी जप्त केल्या. आदिवासींच्या जमिनी माफियांनी हडप केल्या होत्या. त्याविरोधात मीणा यांनी कारवाई केली. त्यामुळे त्यांना दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाते.