अयोध्येतील सोहळ्याकडे 'या' दिग्गजांनी फिरवली पाठ; निमंत्रण असूनही अनुपस्थिती By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:31 PM 2024-01-22T12:31:18+5:30 2024-01-22T12:54:27+5:30
देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे. देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती अयोध्या नगरीत दाखल झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही सुरुवात झाली असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
गावोगावी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राम मंदिर सोहळ्यात स्थानिकांचा सहभाग दिसून येत आहे. संत, महात्मे, स्वामी आणि हिंदू धर्माच्या मठाधिपतींनीही या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. राम मंदिर न्यासकडून त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.
, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. राम मंदिर न्यासकडून त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, तेही या सोहळ्याला जाणार नाहीत. राम मंदिर सोहळ्याला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही निमंत्रण असताना देखील अयोध्येत राम मंदिर सोहळ्याला जाणे टाळले असून भाजपा व आरएसएसवर टीका केली आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर असून आज ते आसाममधील नगाव येथे आहेत. त्यामुळे, तेही अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला जाणार नाहीत. हा सोहळा नरेंद्र मोदी फंक्शन बनल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश हेही अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. भाजपा आणि आरएसएसची ही राजकीय योजना अनेक वर्षांपासून सुरू होती, अशी टीका त्यांनी केलीय.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हेही उत्तर प्रदेशात असूनही अयोध्येत जाणार नाहीत. ते २२ जानेवारीनंतर अयोध्येत दर्शनाला जाणार आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रणाचे पत्र मिळाले आहे. पण, व्यक्तीगत भेट घेऊन कुठलं निमंत्रण मिळालं नाही. मात्र, केजरीवाल हे २२ जानेवारीनंतर सहकुटुंब दर्शनाला जाणार आहेत. त्यामुळे, आज तेही अयोध्येत नसणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत. २२ जानेवारी रोजी सद्भाव रॅली काढणार असून सर्वधर्मसमभाव हाच उद्देश असल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.
आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण होते. मात्र, त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं नाही. ते या सोहळ्याचा उपस्थित असणार नाहीत.
सीपीआयचे महासचिव सिताराम येचुरी यांनाही मंदिर ट्रस्टकडून सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, ह्या सोहळ्याचं राजकारण होत असल्याचे सांगत त्यांनीही अयोध्येत येणं टाळलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांना पत्र लिहून आपण २२ जानेवारीनंतर येथे दर्शनासाठी येणार असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना(युबीटी) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही पोस्टाने या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यांनीही राजकीय सोहळा म्हणत येथे जाणे टाळले. ते आज नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.