तुकाराम मुंढे केवळ 'या' 3 राजकीय नेत्यांनाच ट्विटरवर करतात 'फॉलो' By महेश गलांडे | Published: February 25, 2021 08:24 PM 2021-02-25T20:24:04+5:30 2021-02-25T20:33:23+5:30
अधिकाधिक बदल्यामुळे आणि आपल्या प्रशासकीय दबदब्यामुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे देशातील केवळ 3 राजकीय व्यक्तींना ट्विटरवर फॉलो करतात, त्यामध्ये दोन नेते महाराष्ट्राचे आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सोशल मीडियावर चांगलेच एक्टीव्ह असतात, कोरोना कालावधीत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी नागपूरमधील जनतेशी अनेकदा संवाद साधला.
कोरोना कालावधीत नागपूरमध्ये अप्रतिम काम केल्यामुळेच त्यांच्या निरोप समारंभाला अक्षरश: नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपलं प्रेम व्यक्त केलं.
तुकाराम मुंढेंना जेवढं प्रेम कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचं मिळतं, तेवढच प्रेम सोशल मीडियावरही मिळते. सोशल मीडियातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
त्यामुळेच, सोशल मीडियावरही त्यांची मोठी फॅन फॉलोविंग आहे, तुकाराम मुंढेंच्या अधिकृत फेसबुक पेजला 3 लाख हजार लाईक्स आहेत. तर, त्यांच्या ट्विटर अकाऊंटलाही मोठा फॉलोवर बेस आहे.
सोशल मीडियातील प्रमुख साईट्स म्हणून फेसबुक आणि ट्विटरला प्रधान्यक्रम दिला जातो. तुकाराम मुंढेंच्या फेसबुक पेजला 7 लाख 80 हजार 772 फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटर हँडलला 1 लाख 8 हजार 300 फॉलोअर्स आहेत.
तुकाराम मुंढें 2014 पासून ट्विटरवर कार्यरत असून सद्यस्थिती ते केवळ 68 जणांना फॉलो करतात. त्यामध्ये, ज्येष्ठ पत्रकारांसह विविध क्षेत्रातील बडे हस्ती आहेत.
मुंढेंच्या ट्विटरचा राजकीय दृष्टीकोनातू अभ्यास केल्यास ते देशातील केवळ तीनच राजकीय व्यक्तींना फोलो करतात. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच एक ट्विटर हँडल आहे.
तर, दुसरे राजकीय व्यक्ती म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी हे असून तिसरे राजकीय नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. मुंढेंच्या 68 जणांपैकीच्या फॉलोविंग लीस्टमध्ये महाराष्ट्रातील केवळ दोनच राजकीय व्यक्ती आहेत.
याशिवाय बराक ओबामा यांनाही ते ट्विटरवर फोलो करतात, तसेच गायक शंकर महादेवन, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनाही ते ट्विटरवर फोलो करतात.
उद्योजकापैकी रतन टाटा, आनंद महिंद्रा आणि बिग गेट्स या बड्या उद्योगपतींची नावे त्यांच्या फोलोविंग लीस्टमध्ये आहेत.