हिमालयाच्या कुशीत वसलेलं काश्मीर भयंकर भूस्खलनाच्या घटनांपासून कसं सुरक्षित राहतं? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:05 PM2024-08-02T14:05:13+5:302024-08-02T14:12:10+5:30

wayanad landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे भारतात होणाऱ्या लँडस्लाइडसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे भारतात होणाऱ्या लँडस्लाइडसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

मागच्या काही काळात भारतामध्ये भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही होत आहे. उत्तराखंडसारख्या राज्यात भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तसेच अनेक जणांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

हिमाचल प्रदेश, आसाम, महाराष्ट्र केरळ आदी राज्यांमध्येही मागच्या काही काळात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पण हिमालयाच्या मोठ्या पर्वतरांगा असलेल्या काश्मीरममध्ये मात्र भूस्खलनाच्या घटना मागच्या अनेक वर्षांपासून फार मोठ्या प्रमाणावर घडलेल्या नाहीत. तसेच काश्मीर खोरं अशा आपत्तींपासून अजून तरी सुरक्षित आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे, ते आपण आता पाहूयात.

काश्मिर खोरं भूस्खलनापासून सुरक्षित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिमालयाची वरच्या पर्वतरांगा ह्या भूस्खलनप्रवण क्षेत्रात येत नाहीत. काश्मीरचा बहुतांश भाग हा हिमालयाच्या वरच्या पर्वतरांगांमध्ये येतो. या भागाला ग्रीन एरिया असं म्हटलं जातं. म्हणजेच या भागात फार कमी प्रमाणात लँडस्लाइड होतात.

तसेच काश्मीरच्या उत्तर भागामध्ये कमी प्रमाणात भूस्खलन होण्याचं एक कारण येथील पर्वत देखील आहेत. लाइमस्टोन, सँडस्टोन आणि ग्रॅनाइट यांचं प्रमाण पर्वतांमध्ये असल्यावर अशा घटना घडत नाहीत. त्याशिवाय झेलम आणि सिंधूसारख्या नद्या या भागातून वाहत असल्याने येथील पाण्याची वाहून जाण्याची व्यवस्था सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे भूस्खलनाचा धोका कमी होतो. याशिवाय येथे बर्फाच्छादित पर्वत असल्याने येथील माती ही स्थिर राहते.

मात्र काश्मीरमध्ये भूस्खलन होत नाही असं नाही. पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. तसेच भूस्खलनामुळे येथे मोठी दुर्घटना हल्लीच्या काळात झालेली नाही. मागच्या काही दशकांमध्ये भारताता भूस्खलनामुळे झालेल्या मोठ्या दुर्घटनांपैकी एकही दुर्घटना काश्मीरमध्ये झालेली नाही.