celebration of narali purnima in navi mumbai
नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:12 PM2018-08-25T15:12:16+5:302018-08-25T15:32:49+5:30Join usJoin usNext नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतला महत्त्वाचा सण. नवी मुंबईतील सारसोळेच्या ग्रामस्थांनी नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात, जल्लोषात साजरा केला. नारळी पौर्णिमेला कोळीवाड्यातून पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने आनंदात मिरवणूक काढण्यात आली. पामबीच मार्गावर असलेल्या सारसोळे जेटी परिसरात सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून वाजतगाजत पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पारंपारिक गोडधोड पदार्थ, नाच गाण्यांचा जल्लोष असा माहोल कोळीवाड्यात पाहायला मिळाला. ‘कोळी बांधव नारळी पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. पावसाळ्यात समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. टॅग्स :नवी मुंबईNavi Mumbai