नवी मुंबईत केमिकल कंपनीला आग, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 22:13 IST2017-12-17T22:10:23+5:302017-12-17T22:13:58+5:30

नवी मुंबईतील तुर्भे एम आय डी सी मधील मॉडेप्रो या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. (सर्व फोटो - संदेश रेणोसे )
नवी मुंबई पालिकेची अग्निशमन आणि एम आय डी सी फायरब्रिगेड दोघांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
एमआयडीसीत असलेल्या मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. यात कंपनीचे तीन कामगार जखमी झाले आहेत.
ही आग इतकी भीषण आहे की, आगीचे लोट खारघर ते वाशी परिसरातूनही सहज दिसत आहेत.
ही आग आसपासच्या परिसरात पसरण्याची शक्यता लक्षात घेत जवळच्या कारखान्यांमधील कामगारांना घरी सोडून देण्यात आले आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.