बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 13:06 IST2017-12-26T13:02:52+5:302017-12-26T13:06:18+5:30

बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
हार्बर रेल्वेच्या बेलापूर स्टेशनजवळ ओव्हरहेड व्हायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अप-डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी गाड्यांचा खोळंबा झाल्यानंतर हार्बर रेल्वेवरील प्रवाशांनाही त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
सकाळी 9.55 वाजता बेलापूर इथे डाउन मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल-वाशी अप डाउन वाहतूक बंद झाली आहे.
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
4 दिवसीय ब्लॉक घेऊन देखील 5 व्या दिवशी पुन्हा लोकल रखडल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
याचा फटका ट्रान्स हार्बर मार्गालाही बसला असून तेथे प्रवाशांचे हाल होत आहेत.
उरण-बेलापूर मार्गाच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात आता मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत.
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प